डिसेंबर २९
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | डिसेंबर २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | |||
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | ||
१४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | ||
२१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | ||
२८ | २९ | ३० | ३१ | |||||
२००८ |
डिसेंबर २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६३ वा किंवा लीप वर्षात ३६४ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना व घडामोडी
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८१३ - १८१२चे युद्ध - ब्रिटीश सैनिकांनी बफेलो, न्यूयॉर्क जाळले.
- १८३५ - न्यूएकोटाचा तह - चेरोकी जमातीची मिसिसिपीच्या पूर्वेची सगळी जमीन अमेरिकेच्या स्वाधीन.
- १८४५ - टेक्सास अमेरिकेचे २८वे राज्य झाले.
- १८६२ - अमेरिकन गृहयुद्ध - चिकासॉ बायूची लढाई संपली.
- १८९० - युनाइटेड स्टेट्स सेव्हन्थ कॅव्हेलरी(अमेरिकेचे ७वे घोडदल) कडून सू राष्ट्राच्या ४०० पुरुष, स्त्री व बालकांची वुन्डेड नी येथे कत्तल.
- १८९१ - थॉमस अल्वा एडिसनने रेडियोसाठी पेटंट मिळविला.
[संपादन] विसावे शतक
- १९११ - सुन यात्सेन चीनच्या प्रजासत्ताकचा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला.
- १९१२ - विल्यम ल्योन मॅकेन्झी किंग कॅनेडाच्या पंतप्रधानपदी.
- १९३४ - जपानने १९२२च्या वॉशिंग्टन नाविकी तह व १९३०च्या लंडन नाविकी तहातून अंग काढून घेतले.
- १९३७ - आयरीश मुक्त राज्य संपुष्टात. त्याऐवजी आयर्लंडहा देश अस्तित्त्वात.
- १९४० - दुसरे महायुद्ध-ब्रिटनची लढाई - लुफ्तवाफेने लंडनवर जबर बॉम्बफेक केली. ३,००० नागरिक ठार.
- १९७२ - ईस्टर्न एरलाईन्सचे लॉकहीड ट्रायस्टार जातीचे विमान फ्लोरिडात मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले. १०१ ठार.
- १९७५ - न्यूयॉर्कच्या लाग्वार्डिया विमानतळावर बॉम्बस्फोट. ११ ठार.
- १९८९ - वाक्लाव हावेल चेकोस्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९२ - ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो कोलोर डी मेलोने राजीनामा दिला.
- १९९४ - माझगाव डॉकने तयार केलेली क्षेपणास्त्र वाहक नौका भा.नौ.द. नाशक भारतीय नौदलात दाखल.
- १९९८ - ख्मेर रूजच्या नेत्यांनी कंबोडियातील वंशहत्येबद्दल जगाची माफी मागितली. या प्रकारात १०,००,०००हून अधिक माणसांना मारण्यात आले होते.
[संपादन] एकविसावे शतक
- २००१ - पेरूची राजधानी लिमाच्या ऐतिहासिक मध्यवर्ती भागात आग. २७४ ठार.
- २००५ - बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी.
[संपादन] जन्म
- १७०९ - रशियाची एलिझाबेथ, रशियाची साम्राज्ञी.
- १८०० - चार्ल्स गुडईयर, अमेरिकन शोधक व उद्योगपती.
- १८०८ - ऍन्ड्र्यू जॉन्सन, अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष.
- १८०९ - विल्यम इवार्ट ग्लॅड्स्टोन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८४४ - उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील.
- १९०० - मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारतीय नट, गायक.
- १९१७ - रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक.
[संपादन] मृत्यू
- १९६७ - पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
डिसेंबर २८ - डिसेंबर ३० - डिसेंबर ३१ - जानेवारी १ - (डिसेंबर महिना)