मार्च २३
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | मार्च २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | ||||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ||
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | ||
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | ||
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ||
३० | ३१ | |||||||
माघ/फाल्गुन शके १९२९ |
मार्च २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८१ वा किंवा लीप वर्षात ८२ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] अठरावे शतक
- १७७५ - अमेरिकन क्रांती - पॅट्रिक हेन्रीने आपले रिचमंड, व्हर्जिनिया येथे मला स्वातंत्र्य द्या, नाहीतर मला मृत्यू द्या हे भाषण केले.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०१ - रशियाचा झार पॉल पहिल्याची हत्या.
- १८३९ - बॉस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ.के. या शब्दाचा पहिला छापील उपयोग.
- १८४८ - जॉन विक्लिफ या जहाजातून स्कॉटिश लोक न्यू झीलँडच्या ड्युनेडिन शहराजवळ उतरले व त्यांनी पुढे तेथे वसाहत निर्माण केली.
- १८५७ - न्यूयॉर्क शहरात पहिले उद्वाहक(लिफ्ट) सुरू करण्यात आली.
[संपादन] विसावे शतक
- १९३१ - भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशी.
- १९४२ - जपानी सैन्याने अंदमान द्वीपे काबीज केली.
[संपादन] एकविसावे शतक
- २००१ - रशियाचे मिर हे अंतराळ-स्थानक पृथ्वीवर कोसळले.
- २००३ - २००३च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर मात.
- २००५ - टेक्सास सिटी येथील तेल शुद्धीकरण कारखान्यात स्फोट होउन १५ कामगार मृत्युमुखी पडले.
- २००७ - इराणच्या आरमाराने रॉयल नेव्हीच्या सैनिकांना पकडले.
[संपादन] जन्म
- १६४५ - विल्यम किड, चाचा.
- १६९९ - जॉन बार्ट्राम, अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ.
- १७२३ - आगा मोहम्मद खान घजर, इराणचा राजा.
- १७४९ - पियरे सिमॉन दि लाप्लास, फ्रेंच गणितज्ञ.
- १८२३ - शुय्लर कोलफॅक्स, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १८३१ - एडुआर्ड श्लेगिन्ट्वाइट, जर्मन लेखक.
- १८८१ - रॉजर मार्टिन दु गार्ड, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.
- १८८१ - हेर्मान स्टॉडिंगर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १८८७ - फेलिक्स युसुपोव्ह, रास्पुतिनचा मारेकरी.
- १९१२ - वर्नर फॉन ब्रॉन, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व अभियंता.
- १९३१ - व्हिक्टर कॉर्चनॉय, रशियन बुद्धिबळपटू.
- १९३८ - मेनार्ड जॅक्सन, अटलांटाचा पहिला श्यामवर्णीय महापौर.
- १९६८ - मायकेल आथरटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - इमरान हाश्मी, हिंदी चित्रपट अभिनेता.
[संपादन] मृत्यू
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- प्रजासत्ताकदिन - पाकिस्तान.
मार्च २१ - मार्च २२ - मार्च २३ - मार्च २४ - मार्च २५ - (मार्च महिना)