ऑगस्ट १
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | ऑगस्ट २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
३१ | १ | २ | ||||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | ||
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | ||
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | ||
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० | ||
२००८ |
ऑगस्ट १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१३ वा किंवा लीप वर्षात २१४ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] सहावे शतक
- ५२७ - जस्टीनियन पहिला बायझेन्टाईन सम्राटपदी.
[संपादन] तेरावे शतक
- १२९१ - स्वित्झर्लंड राष्ट्राची रचना.
[संपादन] पंधरावे शतक
- १४६१ - एडवर्ड चौथा इंग्लंडच्या राजेपदी.
- १४९२ - ज्यू व्यक्तींची स्पेनमधून हकालपट्टी.
- १४९८ - क्रिस्टोफर कोलंबसने व्हेनेझुएलात पाउल ठेवले.
[संपादन] सतरावे शतक
- १६९१ - अमेरिकेत पहिले आफ्रिकन गुलाम आणले गेले.
- १६६४ - सेंट गॉट्टहार्डची लढाई - ऑट्टोमन साम्राज्याचा पराभव.
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०० - ग्रेट ब्रिटन व आयर्लंडच्या राज्यांचे युनायटेड किंग्डममध्ये विलीनीकरण.
- १८३१ - लंडन ब्रिज वाहतुकीस खुला.
- १८३४ - ब्रिटीश साम्राज्याने गुलामगिरीस बंदी असल्याचे जाहीर केले.
- १८३८ - त्रिनिदाद व टोबेगोतील गुलामांना मुक्ती.
- १८७६ - कॉलोराडो अमेरिकेचे ३८वे राज्य झाले.
- १८९४ - पहिल्या चीन-जपान युद्धास सुरुवात.
[संपादन] विसावे शतक
- १९०२ - अमेरिकेने फ्रांसकडून पनामा कालवा बांधून वापरण्याचे हक्क विकत घेतले.
- १९१४ - पहिले महायुद्ध - जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.
- १९२७ - चीनी गृहयुद्ध - नान्चांगचा उठाव.
- १९३६ - बर्लिनमध्ये अकरावे ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९४४ - ऍन फ्रँकने आपल्या रोजनिशीत शेवटची नोंद केली.
- १९४४ - पोलंडची राजधानी वॉर्सोमध्ये नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव.
- १९५७ - अमेरिका व कॅनडाने उत्तर अमेरिकी हवाई संरक्षण कमांड (नोरॅड)ची रचना केली.
- १९६० - बेनिनला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६६ - अमेरिकेच्या ऑस्टिन, टेक्सास शहरातील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, ऑस्टिनच्या मुख्य इमारतीतून चार्ल्स व्हिटमनने १५ लोकांना गोळ्या घालून ठार मारले. पोलिसांनी व्हिटमनलाही ठार केले.
- १९६७ - इस्रायेलने पूर्व जेरुसलेम बळकावले.
- १९६८ - हसनल बोल्कियाहला ब्रुनेइच्या राजगादीवर राज्याभिषेक.
- १९९६ - मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला.
[संपादन] एकविसावे शतक
- २००४ - पेराग्वेची राजधानी ऍसन्शनमधील सुपरमार्केटमध्ये आग. २१५ ठार, ३०० जखमी.
[संपादन] जन्म
- इ.स.पू. १० - क्लॉडियस, रोमन सम्राट.
- १२६ - पर्टिनॅक्स, रोमन सम्राट.
- १३१३ - कोगोन, जपानी सम्राट.
- १३७७ - गो-कोमात्सु, जपानी सम्राट.
- १८५६ - जॉर्ज कुल्टहार्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८५७ - जॉन हॅरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८६१ - सॅमी जोन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९०० - ओट्टो नथ्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१० - मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२४ - फ्रँक वॉरेल, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू.
- १९३५ - जॉफ पुलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५२ - झोरान डिंडिक, सर्बियाचा पंतप्रधान.
- १९५२ - यजुर्वेन्द्रसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९५५ - अरूणलाल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - मायकेल वॅटकिन्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - ग्रॅहाम थोर्प, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - मसूद राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ३७१ - संत युसेबियस.
- ११३७ - लुई सहावा, फ्रांसचा राजा.
- १७१४ - ऍन, इंग्लंडची राणी.
- १९२० - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक.
- १९२९ - सिड ग्रेगरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९९९ - निरद चौधरी, इंग्लिश लेखक.
- २००५ - फह्द, सौदी अरेबियाचा राजा.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी - भारत.
- सैन्य दिन - अँगोला, चीन, लेबेनॉन.
- मुक्ती दिन - त्रिनिदाद व टोबेगो, बार्बेडोस.
- राष्ट्र दिन - बेनिन, स्वित्झर्लंड.
- मातृ-पितृ दिन - कॉँगो.
- उत्सव दिन - निकाराग्वा.
-
जुलै ३० - जुलै ३१ - ऑगस्ट १ - ऑगस्ट २ - ऑगस्ट ३ - ऑगस्ट महिना