जानेवारी १०
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | जानेवारी २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ४ | ५ | ||||
६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | ||
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | ||
२० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | ||
२७ | २८ | २९ | ३० | ३१ | ||||
मार्गशीर्ष/पौष शके १९२९ |
जानेवारी १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १० वा किंवा लीप वर्षात १० वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] पहिले शतक
[संपादन] तिसरे शतक
- २३६ - संत फाबियान पोपपदी.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०६ - बोअर युद्ध - केप टाउनच्या डच वसाहतीने ब्रिटीश सैन्यासमोर शरणागती पत्करली.
- १८१० - नेपोलियन बोनापार्ट व जोसेफिन दि बोहार्नेचे लग्न मोडले.
- १८११ - लुईझियानातील दोन पॅरिशमध्ये(जिल्हे) गुलामांचा उठाव.
- १८६१ - अमेरिकन गृहयुद्ध - फ्लोरिडा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातून विभक्त झाले.
- १८६३ - लंडनमधील भुयारी रेल्वे पॅडिंग्टन व फॅरिंग्डन स्ट्रीट या स्थानकांमध्ये सुरू.
[संपादन] विसावे शतक
- १९०१ - बोमोन्ट, टेक्सास जवळ खनिज तेल सापडले.
- १९२० - लीग ऑफ नेशन्सने आपल्या पहिल्या बैठकीत व्हर्सायच्या तहाला मान्यता दिली.
- १९२३ - लिथुएनियाने मेमेल बळकावले.
- १९२९ - टिनटिनची चित्रकथा पहिल्यांदा प्रकाशित.
- १९४६ - लंडनमध्ये संयुक्त राष्ट्रांचीची पहिली सर्वसाधारण सभा. ५१ राष्ट्रे उपस्थित.
- १९५७ - हॅरोल्ड मॅकमिलन युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- १९८९ - क्युबाने अँगोलातून सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.
[संपादन] एकविसावे शतक
- २००१ - विकिपिडीया न्यूपिडीयाचा एक भाग म्हणून सुरू झाला. पाच दिवसांनी त्याचे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण झाले.
[संपादन] जन्म
- १८१५ - सर जॉन अलेक्झांडर मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पहिला पंतप्रधान.
- १८६९ - ग्रिगोरी रास्पुतिन, रशियन सन्यासी, राजकारणी.
- १८७१ - ज्यो ट्रॅव्हर्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८९६ - काकासाहेब तथा नरहर विष्णु गाडगीळ, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी साहित्यिक, वक्ता.
- १९०३ - ह्यु मॉटली थर्लो, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१३ - गुस्ताव हुसाक, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१७ - टायरेल जॉन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९१८ - आर्थर चुंग, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२७ - शिवाजी गणेशन, तमिळ चित्रपट अभिनेता.
- १९३३ - लेन कोल्डवेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३८ - डोनाल्ड क्नुथ, अमेरिकन गणितज्ञ व संगणकशास्त्रज्ञ.
- १९७४ - ह्रितिक रोशन, भारतीय चित्रपट अभिनेता.
- १९७५ - जेम्स कर्टली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - जेहान मुबारक, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ६८१ - पोप अगाथो.
- १०९४ - खलिफा अल् मुस्तान्सर.
- १२७६ - पोप ग्रेगोरी दहावा.
- १८६२ - सॅम्युएल कोल्ट, अमेरिकन संशोधक.
- १९१७ - बफेलो बिल कोडी, अमेरिकन साहसिक.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- मार्गारेट थॅचर दिन - फॉकलंड द्वीप.
जानेवारी ८ - जानेवारी ९ - जानेवारी १० - जानेवारी ११ - जानेवारी १२ - (जानेवारी महिना)