फेब्रुवारी ३
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | फेब्रुवारी २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | |||||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | ||
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | ||
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | ||
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |||
पौष/माघ शके १९२९ |
फेब्रुवारी ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४ वा किंवा लीप वर्षात ३४ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] पंधरावे शतक
- १४५१ - महमद तिसरा ऑट्टोमान सम्राटपदी.
- १४८८ - बार्थोलोम्यु डायसने केप ऑफ गुड होपला वळसा घालुन मॉसेल बे येथे नांगर टाकला.
[संपादन] सतरावे शतक
- १६९० - मासेच्युसेट्सने अमेरिकेतील पहिले कागदी चलन वापरायला सुरूवात केली.
[संपादन] अठरावे शतक
- १७८३ - अमेरिकन क्रांति - स्पेनने अमेरिकेचे स्वातंत्र्य मान्य केले.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०९ - अमेरिकेत ईलिनॉय प्रांताची रचना.
- १८६७ - जपानचा युवराज मात्सुहितोचा सम्राट मैजी या नावाने राज्याभिषेक.
- १८७० - अमेरिकेच्या संविधानातील १५वा बदल अमलात. मतदानातील वंशभेद संपुष्टात.
[संपादन] विसावे शतक
- १९१३ - अमेरिकेच्या संविधानातील १६वा बदल अमलात. केंद्रीय सरकारला आयकर घेण्यास मुभा.
- १९१६ - कॅनडात ओट्टावातील संसदेची ईमारत आगीत भस्मसात.
- १९१७ - पहिले महायुद्ध - अमेरिकेने जर्मनीशी राजकीय संबंध तोडले.
- १९३१ - न्यू झीलँडच्या नेपियर शहरात भूकंप. २३८ ठार.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - नाझींनी पियरे लव्हालला फ्रांसच्या पंतप्रधानपदी बसवले.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने मार्शल द्वीपसमूह काबीज केला.
- १९५९ - विमान अपघातात अमेरिकन संगीतकार बडी हॉली, रिची व्हॅलेन्स व बिग बॉपर मृत्युमुखी.
- १९६६ - सोवियेत संघाचे लुना ९ हे मानवविरहीत अंतराळयान चंद्रावर उतरले.
- १९७२ - जपानच्या सप्पोरो शहरात हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९८४ - स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.
- १९८९ - दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्ष पी.डब्ल्यु. बोथाने राजीनामा दिला.
- १९९७ - पाकिस्तानमध्ये निवडणुका.
[संपादन] एकविसावे शतक
- २००६ - लाल समुद्रात फेरी बुडाली. १,२०० ठार झाल्याची भीती.
[संपादन] जन्म
- १८११ - होरेस ग्रीली, अमेरिकन पत्रकार, संपादक व प्रकाशक.
- १८३० - रॉबर्ट आर्थर टॅलबोट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८८७ - हुआन नेग्रिन, स्पेनचा पंतप्रधान.
- १९२० - हेन्री हाइमलिख, अमेरिकन डॉक्टर.
[संपादन] मृत्यू
- १०१४ - स्वेन पहिला, डेन्मार्कचा राजा.
- १११६ - कोलोमान, हंगेरीचा राजा.
- १४५१ - मुराद दुसरा, ऑट्टोमन सम्राट.
- १४६८ - योहान्स गटेनबर्ग, जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक.
- १९२४ - वूड्रो विल्सन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
- १९८५ - फ्रँक ऑपनहाइमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- २००५ - झुराब झ्वानिया, जॉर्जियाचा पंतप्रधान.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
फेब्रुवारी १ - फेब्रुवारी २ - फेब्रुवारी ३ - फेब्रुवारी ४ - फेब्रुवारी ५ - (फेब्रुवारी महिना)