जानेवारी ३ - १९६५च्या युद्धात भारतीय विजयानंतर भारतीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व पाकिस्तानी अध्यक्ष अयुबखान यांच्यात ताश्केंतमध्ये युद्धविरामाचा ठराव.
जानेवारी ११ - भारतीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा ताश्केंतमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.
जानेवारी १७ - स्पेनमध्ये पालोमारेस गावाजवळ अमेरिकेच्या बी.५२ बॉम्बर व के.सी.१३५ जातीच्या विमानात टक्कर. बी.५२ मधून तीन ७० कि.टन क्षमतेचे हायड्रोजन बॉम्ब जमिनीवर पडले व एक समुद्रात.
जानेवारी १९ - अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याने इंदिरा गांधींची भारताच्या पंतप्रधानपदी निवड.
जानेवारी २४ - भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधींचा शपथविधी.
ऑगस्ट १ - अमेरिकेच्याऑस्टिन, टेक्सास शहरातील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, ऑस्टिनच्या मुख्य इमारतीतून चार्ल्स व्हिटमनने १५ लोकांना गोळ्या घालून ठार मारले. पोलिसांनी व्हिटमनलाही ठार केले.