जानेवारी ३
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | जानेवारी २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ४ | ५ | ||||
६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | ||
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | ||
२० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | ||
२७ | २८ | २९ | ३० | ३१ | ||||
मार्गशीर्ष/पौष शके १९२९ |
जानेवारी ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३ वा किंवा लीप वर्षात ३ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] पंधरावे शतक
- १४३१ - जोन ऑफ आर्क बिशप पियरे कॉशोंच्या हाती लागली.
- १४९६ - लिओनार्डो दा विन्चीने उड्डाणयंत्राचा एक असफल प्रयोग केला.
[संपादन] सोळावे शतक
- १५२१ - पोप लिओ दहाव्याने पोपचा फतवा काढून मार्टिन ल्यूथरला वाळीत टाकले.
[संपादन] अठरावे शतक
- १७७७ - प्रिंसटनची लढाई - जॉर्ज वॉशिंग्टनने चार्ल्स कॉर्नवॉलिसचा पराभव केला.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८१५ - ऑस्ट्रिया, ब्रिटन व फ्रांसने एक गुप्त तह मंजूर करून रशिया व प्रशिया विरूद्ध संयुक्त फळी उभारली.
- १८२३ - स्टीवन ऑस्टिनने मेक्सिको सरकारकडून टेक्सासमध्ये जमीन मिळविली.
- १८३३ - ब्रिटनने फॉकलंड द्वीपसमूह बळकाविले.
- १८३४ - स्टीवन ऑस्टिनला मेक्सिको सरकारने मेक्सिको सिटीत तुरूंगात टाकले.
- १८५५ - हवाईमध्ये चीनी नागरिकांचे प्रथम आगमन.
- १८६१ - अमेरिकन गृह युद्ध - डेलावेरने संयुक्त संस्थानातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला.
- १८६८ - जपानमध्ये शोगन सत्ता संपली. मैजी वंश पुन्हा राज्यकर्ता.
[संपादन] विसावे शतक
- १९२१ - तुर्कस्तानने आर्मेनियाशी संधी केली.
- १९२५ - बेनितो मुसोलिनीने इटलीत हुकुमशाही जाहीर केली.
- १९५९ - अलास्का अमेरिकेचे ४९वे राज्य झाले.
- १९६१ - अमेरिकेने क्युबाशी संबंध तोडले.
- १९६२ - पोप जॉन तेविसाव्याने फिदेल कास्त्रोला वाळीत टाकले.
- १९९० - पनामाच्या मनुएल नोरिगाने अमेरिकी सैन्यासमोर आत्मसमर्पण केले.
- १९९४ - रशियात ईर्खुट्स्क येथून निघालेले एरोफ्लोतचे टी.यू.१५४ प्रकारचे विमान कोसळले. जमिनीवरील एकासह १२५ ठार.
[संपादन] एकविसावे शतक
- २००४ - ईजिप्तच्या फ्लॅश एरलाईन्स फ्लाईट ६०४ हे बोईंग ७३७ प्रकारचे विमान लाल समुद्रात कोसळले. १४८ ठार.
[संपादन] जन्म
- इ.स.पू. १०६ - सिसेरो, रोमन राजकारणी.
- ११९६ - त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट.
- १८३१ - सावित्रीबाई फुले, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी.
- १८८३ - क्लेमेंट ऍटली, ब्रिटीश पंतप्रधान.
- १८८६ - जॅक झुल्च, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८९२ - जे.आर.आर.टोकियेन, ब्रिटीश लेखक व भाषाशास्त्री, लॉर्ड ऑफ द रिंग्ज या पुस्तकत्रयीचा लेखक.
- १९१७ - कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक.
- १९२२ - चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक.
- १९३१ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.
- १९७१ - आमेर नझीर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ७२२ - गेमेई, जपानी सम्राज्ञी.
- १३२२ - फिलिप पाचवा, फ्रांसचा राजा.
- १४३७ - व्हाल्वाची कॅथेरीन, इंग्लंडचा राजा हेन्री पाचवा याची पत्नी.
- १५४३ - हुआन रोद्रिगेझ काब्रियो, पोर्तुगालचा शोधक.
- १९६७ - जॅक रूबी, ली हार्वे ऑस्वाल्डचा मारेकरी.
- १९७५ - ललित नारायण मिश्रा, भारतीय रेल्वेमंत्री, राजकारणी.
- १९८२ - अब्राहम डेव्हिड, भारतीय अभिनेता.
- १९९४ - अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार लेखक.
- १९९८ - केशव विष्णू बेलसरे, मराठी तत्त्वज्ञानी.
- २००१ - सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री, भारतीय राजकारणी.
- २००२ - फ्रेडी हाइनिकेन, डच बियर उद्योगपती.
- २००२ - सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ.
- २००५ - जे.एन.दिक्षित, भारतीय राजकारणी.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
जानेवारी १ - जानेवारी २ - जानेवारी ३ - जानेवारी ४ - जानेवारी ५ - (जानेवारी महिना)