फेब्रुवारी १३
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | फेब्रुवारी २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | |||||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | ||
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | ||
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | ||
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |||
पौष/माघ शके १९२९ |
फेब्रुवारी १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४४ वा किंवा लीप वर्षात ४४ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] बारावे शतक
- ११३० - इनोसंट दुसरा पोपपदी.
[संपादन] सोळावे शतक
- १५७५ - हेन्री तिसरा फ्रांसच्या राजेपदी.
[संपादन] सतरावे शतक
- १६६८ - स्पेनने पोर्तुगालचा स्वातंत्र्य मान्य केले.
[संपादन] विसावे शतक
- १९३४ - चेलियुस्किन हे रशियाचे जहाज आर्क्टिक समुद्राच्या बर्फात अडकुन फुटले व बुडाले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - सोवियेत सैन्याने हंगेरीची राजधानी बुडापेस्ट काबीज केली.
- १९६० - फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.
- १९७१ - अमेरिकेच्या सैन्याची मदत घेउन दक्षिण व्हियेतनामने लाओसवर चढाई केली.
- १९७४ - सोवियेत संघाने अलेक्झांडर सोल्झेनित्सिनला हद्दपार केले.
- १९८४ - युरी आंद्रोपोव्ह नंतर कॉन्स्टान्टीन चेरनेन्को सोवियेत संघाचा अध्यक्ष झाला.
- १९८८ - कॅनडात कॅल्गारी येथे पंधरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
[संपादन] एकविसावे शतक
- २००१ - एल साल्व्हाडोरमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.६ तीव्रतेचा भूकंप. ४०० ठार.
[संपादन] जन्म
- १५९९ - पोप अलेक्झांडर सातवा.
- १८४२ - टेड पूली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८५८ - हॅरी मोझेस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८७९ - सरोजिनी नायडू, बंगाली कवियत्री.
- १९०४ - एडी डॉसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९११ - फैझ अहमद फैझ, पाकिस्तानी कवी.
- १९१५ - ऑँग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.
- १९२३ - चक यीगर, नासाचा स्वनातीत विमान चालवणारा प्रथम वैमानिक.
- १९३३ - पॉल बिया, कामेरूनचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५० - लेन पास्को, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५७ - थेल्स्टन पेन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - सुब्रोतो बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ११३० - पोप ऑनरियस दुसरा.
- १२१९ - मिनामोटो नो सानेटोमो, जपानी शोगन.
- १३२२ - अँड्रोनिकस, बायझेन्टाईन सम्राट.
- १६६० - चार्ल्स दहावा, स्वीडनचा राजा.
- १८८३ - रिचर्ड वॅग्नर, जर्मन संगीतकार.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
फेब्रुवारी ११ - फेब्रुवारी १२ - फेब्रुवारी १३ - फेब्रुवारी १४ - फेब्रुवारी १५ - (फेब्रुवारी महिना)