नोव्हेंबर ३०
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | नोव्हेंबर २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
३० | १ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ||
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | ||
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | ||
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ||
२००८ |
नोव्हेंबर ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३३ वा किंवा लीप वर्षात ३३४ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] अठरावे शतक
- १७८२ - अमेरिकन क्रांति - पॅरिसमध्ये अमेरिका व ग्रेट ब्रिटनच्या प्रतिनिधींनी प्राथमिक संधी करार मान्य केला. या करारावर १७८३ मध्ये पॅरिसचा तह म्हणून शिक्का-मोर्तब झाले.
[संपादन] एकोणविसावे शतक
- १८०३ - न्यू ऑर्लिअन्स येथे स्पेनच्या प्रतिनिधीने लुईझियाना प्रांत फ्रांसच्या प्रतिनिधीकडे हस्तांतरित केला. २० दिवसांनी फ्रांसने हा प्रांत यू.एस.ला लुईझियाना परचेसचा हिस्सा महणून विकला.
- १८०३ - क्रिमीअन युद्ध - सिनोपच्या लढाईत रशियाच्या नौदलाने ऑट्टोमन जहाजांचा तांडा बुडविला.
- १८७२ - पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड वि. इंग्लंड हा हॅमिल्टन क्रेसेंट, ग्लासगो येथे खेळला गेला.
[संपादन] विसावे शतक
- १९३९ - रशियाच्या सैन्याने फिनलंडवर चढाई करून मॅनरहाइम रेषेपर्यंत धडक मारली.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन अध्यक्ष फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट, ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल व सोव्हियेत अध्यक्ष जोसेफ स्टालिन यांचे ऑपरेशन ओव्हरलॉर्ड बद्दल एकमत झाले. ऑपरेशन ओव्हरलॉर्ड हे जून १९४४ मध्ये दोस्त राष्ट्रांच्या यूरोपवरील हल्ल्याच्या आराखड्याला दिलेले गुप्त नाव होते.
- १९६६ - बार्बाडोसला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६६ - दक्षिण यमनच्या प्रजासत्ताकला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
[संपादन] एकविसावे शतक
- २००४ - लायन एर फ्लाईट ५३८ हे विमान इंडोनेशियाच्या जावा बेटावरील सुरकर्ता गावाजवळ कोसळले. २६ ठार.
[संपादन] जन्म
- ५३९ - तूर्सचा ग्रेगोरी, फ्रांसचा इतिहासकार.
- १७५६ - अर्न्स्ट क्लाड्नी, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १७६८ - जेड्रेज स्नियाडेकी, पोलिश भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, लेखक.
- १८१० - ऑलिव्हर विन्चेस्टर, अमेरिकन संशोधक.
- १८१७ - थियोडोर मोम्सेन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक.
- १८३५ - सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन, अमेरिकन लेखक.
- १८४७ - अफोन्सो ऑगुस्तो मोरेरा पेना , ब्राझिलचा सहावा राष्ट्राध्यक्ष.
- १८५७ - बॉबी एबेल , इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८५८ - जगदीशचंद्र बोस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
- १८६९ - गुस्ताफ डालेन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८७४ - सर विन्स्टन चर्चिल, नोबेल पारितोषिक विजेता युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९१५ - हेन्री टॉब, नोबेल पारितोषिक विजेता कॅनडाचा रसायनशास्त्रज्ञ.
- १९३६ - दिमित्री व्हिक्टोरोविच अनोसोव्ह, रशियन गणितज्ञ.
[संपादन] मृत्यू
- १०१६ - एडमंड दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १७१८ - चार्ल्स बारावा, स्वीडनचा राजा.
- १९०० - ऑस्कार वाइल्ड, आयरिश लेखक.
- १९०१ - एडवर्ड जॉन आयर, इंग्लिश शोधक.
- २००७ - एव्हेल कनीव्हेल, अमेरिकन साहसिक.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- बार्बाडोस - स्वातंत्र्य दिन.
नोव्हेंबर २९ - डिसेंबर १ - डिसेंबर २ - डिसेंबर ३ - (नोव्हेंबर महिना)