फेब्रुवारी १
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | फेब्रुवारी २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | |||||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | ||
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | ||
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | ||
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |||
पौष/माघ शके १९२९ |
फेब्रुवारी १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२ वा किंवा लीप वर्षात ३२ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] सतरावे शतक
[संपादन] अठरावे शतक
- १७९० - न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सत्र सुरू झाले.
- १७९३ - फ्रांसने नेदरलँड्स व युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारले.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८१४ - फिलिपाईन्सच्या मेयोन ज्वालामुखीचा उद्रेक १,२०० ठार.
- १८६१ - अमेरिकन गृहयुद्ध - टेक्सास अमेरिकेपासून विभक्त झाले.
- १८८४ - ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित. तेव्हापासून ऑक्सफर्डच्या कोशांचे काम अव्याहतपणे चालूच आहे.
[संपादन] विसावे शतक
- १९०८ - पोर्तुगालचा राजा कार्लोस पहिला व राजकुमार लुइस फिलिपेची हत्या.
- १९२० - कॅनडात रॉयल केनेडियन माउंटेड पोलिस तथा माउंटीज् या पोलिस संघटनेची स्थापना.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - नाझी सैन्याने व्हिडकुन क्विस्लिंगला नॉर्वेच्या पंतप्रधानपदी बसवले.
- १९४६ - नॉर्वेच्या त्रिग्वे लीची संयुक्त राष्ट्रांच्या प्रथम सरचिटणीस पदी निवड.
- १९७४ - साओ पाउलो, ब्राझिलमध्ये कार्यालये असलेल्या ईमारतीला आग. १८९ ठार, २९३ जखमी.
- १९७९ - आयातोल्ला खोमेनी १५ वर्षांनी परत ईराणमध्ये आला.
- १९८१ - ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडमधील क्रिकेट एक दिवसीय सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यू झीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाउ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म फेकी करण्यास सांगितले. ट्रेव्हरने तसे केले, ऑस्ट्रेलिया सामना जिंकले परंतु यानंतर अंडरआर्म फेकी बेकायदा ठरवण्यात आली.
- १९९१ - लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर यु.एस. एरचे विमान दुसर्या छोट्या विमानाला धडकले. ३५ ठार.
- १९९२ - भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले.
[संपादन] एकविसावे शतक
- २००२ - आयर्लंडमधील शांतता प्रक्रियेला चालना देणार्या 'गुड फ्रायडे' कराराचे शिल्पकार जॉन ह्यूम यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा गांधी शांतता पुरस्कार प्रदान.
- २००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी.
- २००४ - मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार.
[संपादन] जन्म
- १८८१ - टिप स्नूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - लुई स्टीवन सेंट लॉरें, कॅनडाचा १२वा पंतप्रधान.
- १८८४ - म.म.सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित.
- १९०१ - क्लार्क गेबल, अमेरिकन अभिनेता.
- १९०४ - बा.रा.घोलप, शिक्षणमहर्षी
- १९१० - जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२२ - क्लिफर्ड मॅकवॉट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९३० - शहाबुद्दीन अहमद, बांगलादेशी राष्ट्राध्यक्ष.
- १९३१ - बोरिस येल्त्सिन, रशियन राष्ट्राध्यक्ष.
- १९३१ - इयाजुद्दीन अहमद, बांगलादेशी राष्ट्राध्यक्ष.
- १९४२ - डेव्हिड सिनकॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५० - नसीर मलिक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता.
- १९६५ - डेव्ह कॅलाहन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - महबुबुर रहमान, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - कर्टली ऍम्ब्रोझ, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - ग्रेम स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८२ - शोएब मलिक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- १३२८ - चार्ल्स चौथा, फ्रांसचा राजा.
- १५६३ - मेनास, इथियोपियाचा सम्राट.
- १६९१ - पोप अलेक्झांडर आठवा.
- १७३३ - ऑगस्टस दुसरा, पोलंडचा राजा.
- १९०८ - कार्लोस पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १९८१ - डोनाल्ड विल्स डग्लस, सिनियर, अमेरिकन विमानतंत्रज्ञ.
- १९९५ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार
- २००३ - स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर -
-
- मायकेल पी. अँडरसन
- डेव्हिड ब्राउन
- कल्पना चावला
- लॉरेल क्लार्क
- रिक डी. हसबंड
- विली मॅककूल
- इलान रमोन
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
जानेवारी ३० - जानेवारी ३१ - फेब्रुवारी १ - फेब्रुवारी २ - फेब्रुवारी ३ - (फेब्रुवारी महिना)