ऑस्ट्रेलिया
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया | ||||||
ऑस्ट्रेलिया राष्ट्रकुल | ||||||
|
||||||
जागतिक नकाशावरील स्थान | ||||||
राजधानी | कॅनबेरा | |||||
सर्वात मोठे शहर | सिडनी | |||||
राष्ट्रीय चलन | ऑस्ट्रेलियन डॉलर |
ऑस्ट्रेलिया पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक देश आहे. याच्या भूभागात ऑस्ट्रेलिया खंड, तास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
साधारणपणे तीस ते पन्नास हजार वर्षे ऑस्ट्रेलियातील आदिवासी एकाच पद्धतीची जीवनपद्धतीने जगत होते. अठराव्या शतकात युरोपिय लोकांना या खंडाचा शोध लागला. आधी डच, फ्रेंच व मग ब्रिटिश येथे आले. त्या आधीच चीनी लोकांना ऑस्ट्रेलिया खंड ज्ञात होता. आलेल्या युरोपीयनांनी येथिल आदिवासींना हुसकावून लावले व आपल्या वसाहती वसवल्या. ज्यांनी विरोध केला त्यांच्या कत्तली करण्यात आल्या. पहिली वसाहत आताच्या सिडनी जवळ वसवण्यात आली. त्यानुसार सिडनी हे ऑस्ट्रेलियाचे आद्य शहर म्हणून ओळखले जाते.
[संपादन] नावाची व्युत्पत्ती
युरोपातील पुराण कथांमधून ऑस्ट्रालिस या खंडाचा (काल्पनिक) उल्लेख आढळतो. मॅथ्यु फ्लिंडर्स या दर्यावर्दी खलाशाने ऑस्ट्रेलिया खंडाला प्रदक्षिणा पुर्ण केली त्यावेळी त्याला वाटले की ऑस्ट्रालिस सापडले. म्हणून त्याने नकाशावर ऑस्ट्रेलिया अशी नोंद केली. व या खंडाला ऑस्ट्रेलिया हे नाव मिळाले.
[संपादन] प्रागैतिहासिक कालखंड
[संपादन] भूगोल
[संपादन] चतु:सीमा
ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला हिंदी महासागर आणी इंडोनेशिया, पूर्व तिमोर व पापुआ न्यू गिनी हे देशच ईशान्येला पॅसिफिक महासागर आणी सोलोमन द्वीपे, व्हानुआटु व न्यू कॅलिडोनिया हे देश/प्रदेश तर आग्नेयेला न्यूझीलँड हा देश आहे. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेला अँटार्क्टिक महासागर आहे.
[संपादन] राजकीय विभाग
- न्यु साउथ वेल्स राज्य
- व्हिक्टोरिया राज्य
- साउथ ऑस्ट्रेलिया राज्य
- नॉर्दर्न टेरिटरी
- वेस्टर्न ऑस्ट्रेलिया राज्य
- टास्मानिया राज्य
[संपादन] मोठी शहरे
[संपादन] समाजव्यवस्था
दुसर्या जागतिक महायुद्धा नंतर येथे मुख्यतः इटली व ग्रीस येथून लोक देशांतरीत झाले. त्या नंतर पुर्व युरोपातील अनेक देशां मधून येथे राहण्यासाठी लोक आले. इ.स. १९७३ साली ऑस्ट्रेलिया हा फक्त गोर्या लोकांसाठी राखीव ठेवण्याचा कायदा (व्हाईट ऑस्ट्रेलिया पॉलिसी) रद्द करावा लागला. (इंग्रजी: White Australia Policy). व्हियेतनाम युद्धा नंतर व्हियेतनामी लोकांनीही मोठ्याप्रमाणात देशांतर केले. ऐशीच्या दशकात थायलंड, चीन व इंडोनेशिया येथील लोकही आले.
[संपादन] वस्तीविभागणी
[संपादन] धर्म
मुख्यतः ख्रिश्चन हिंदु, मुस्लीम व बौद्ध अल्पसंख्य
[संपादन] शिक्षण
ऑस्ट्रेलिया येथील शिक्षण पद्धती दोन विभागात विकसित आहे - तंत्र शिक्षण (इंग्रजी: Technical And Further Education TAFE ) व पदवी शिक्षण तसेच पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध आहे. शिक्षण निर्यात हा येथील सरकार एक प्रमुख व्यवसाय मानते. विविध विद्यापीठे यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. मुख्यत: व्हियेतनाम , मलेशिया , इंडोनेशिया व चीन या देशातून येथे शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. भारतातून येणारे विद्यार्थी साधारण पणे ९% (संदर्भ?) आहेत असे मानले जाते. जास्तीत जास्त परदेशी विद्यार्थी मिळावेत यासाठी सर्व विद्यापीठांनी मिळून आय. डी. पी. एज्युकेशन (इंग्रजी: IDP Education) ही संस्था स्थापन केली आहे.