व्हिक्टोरिया राज्य
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
व्हिक्टोरिया राज्य Victoria हे ऑस्ट्रेलियातील सर्वात छोटे राज्य आहे. हा प्रदेश राज्य म्हणून १९०१ साली ऑस्ट्रेलियात सामील झाला. याची सुरुवात सन १८३० पासून एक शेतीप्रधान व्यवसाय असलेले राज्य अशी झाली. १८५१ साली बेंडीगो Bendigo. व बॅलाराट Ballarat या ठिकाणी लागलेल्या सोन्याच्या शोधामुळे या राज्याची भरभराट झाली. येथे आयर्लंड व चीन येथून अनेक लोक आले. ऑस्ट्रेलियाच्या न्यु साउथ वेल्स New South Wales या राज्या नंतर सर्वात जास्त लोकसंख्या असलेले हे राज्य आहे. २००६ साली झालेल्या जनगणने नुसार येथे ४९,३२,२४२ इतकी लोकसंख्या आहे. या राज्याचे मेलबर्न हे राजधानी चे शहर आहे. राज्याचे जीलाँग Geelong , बॅलाराट Ballarat, बेंडीगो Bendigo, शेपर्टन Shepparton, मिलदुरा Mildura, वार्नांबुल Warrnambool and the ला ट्रोब व्हॅली Latrobe Valley. हे मुख्य शहरी विभाग आहेत.
सुमारे ६०% लोक हे ख्रिश्चन आहेत. १३२६३४ लोकसंख्येमुळे बौद्ध धर्म हा दुसर्या क्रमांकाचा धर्म आहे. सुमारे एक लाख मुस्लीम लोक आहेत. तसेच सुनमारे ४० हजार ज्यु आहेत. या राज्यातील २० % लोक कोणताही धर्म मानत नाहीत.