See also ebooksgratis.com: no banners, no cookies, totally FREE.

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
सिंगापूर - विकिपीडिया

सिंगापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिंगापूर
Republik Singapura (मलाय)
新加坡共和国 (सोपी चिनी)
சிங்கப்பூர் குடியரசு (तमिळ)
Republic of Singapore (इंग्लिश)

सिंगापुराचे प्रजासत्ताक
ब्रीदवाक्य "Majulah Singapura" (मलाय)
"निरंतर पुढे, सिंगापूर"
राजधानी सिंगापूर शहर
राष्ट्रप्रमुख सेल्लपन रामनाथन
पंतप्रधान ली ह्सिएन लूंग
स्वातंत्र्यदिवस ऑगस्ट ९, १९६५ (मलेशियापासून विलग)
राष्ट्रीय भाषा मलाय
चिनी
तमिळ
इंग्लिश
राष्ट्रीय चलन सिंगापूर डॉलर
(SGD)
क्षेत्रफळ
एकूण–
पाणी–
१९०वा क्रमांक

७०४.० किमी²

१.४४४ %
लोकसंख्या
एकूण–
घनता–
११७वा क्रमांक
४६,८०,६००
६,३६९.२ प्रती किमी²
आंतरराष्ट्रीय कालविभाग सिंगापूर प्रमाणवेळ (यूटीसी +८)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +६५
आंतरजाल प्रत्यय .sg
वार्षिक सकल उत्पन्न
(GDP)
वा क्रमांक
१७१.९५ अब्ज अमेरिकन डॉलर
किंवा
सिंगापूर डॉलर
(SGD)

सिंगापूर हे आग्नेय आशियातील मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास वसलेले द्वीपराष्ट्र आहे. विषुववृत्तापासून १३७ कि.मी. (८५ मैल) उत्तरेस असलेल्या या देशाच्या उत्तरेस मलेशियाचा जोहोर प्रांत व दक्षिणेस इंडोनेशियाची रिआउ बेटे आहेत. अवघे ७०४.० कि.मी. (२७२ वर्ग मैल) क्षेत्रफळ असलेले सिंगापूर हे जगात मोजक्या संख्येने उरलेल्या नगरराज्यांपैकी एक असून आग्नेय आशियातील सर्वात छोटे राष्ट्र आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

फेब्रुवारी ६, १८१९ रोजी सर थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्सने सिंगापूर शहराची स्थापना केली.

फेब्रुवारी १५ १९४२ या दिवशी सिंगापुरात ब्रिटिश सैन्याने जपानी सैन्यासमोर शरणागती पत्करली. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.

[संपादन] नावाची व्युत्पत्ती

[संपादन] प्रागैतिहासिक कालखंड

[संपादन] भूगोल

सिंगापुरात मुख्य भूमी धरून ६३ बेटे आहेत. दोन मानवनिर्मित पुलांद्वारे सिंगापूर मलाय द्वीपकल्पाला जोडले आहे. जोहोर-सिंगापूर कॉजवे हा पूल सिंगापुराला उअत्तरेकडच्या जोहोर नावाच्या मलेशियन प्रांताला जोडतो; तर तुआस सेकंड लिंक हा पूल पश्चिमेकडून जोहोरला जोडतो. जूरोंग बेट, पुलाउ तेकोंग, पुलाउ उबिन व सेंटोसा ही सिंगापुराची प्रमुख बेटे आहेत. सिंगापूर बेटावरील बराचसा भाग समुद्रसपाटीलगतच असून बुकित तिमा ही १६६ मी. (५४५ फूट) उंची असलेली टेकडी देशातील सर्वात उंच ठिकाण आहे.


[संपादन] चतु:सीमा

[संपादन] राजकीय विभाग

[संपादन] मोठी शहरे

[संपादन] समाजव्यवस्था

[संपादन] वस्तीविभागणी

[संपादन] धर्म

[संपादन] शिक्षण

[संपादन] भाषा

ऐतिहासिक वारश्याने मलाय ही सिंगापुरातील महत्त्वाची भाषा आहे. सिंगापूर प्रजासत्ताकाचे राष्ट्रगीत ’माजुला सिंगापुरा’ हेदेखील याच भाषेत आहे. सिंगापूर प्रजासत्ताकाच्या चार अधिकृत भाषा आहेत: इंग्लिश, मलाय, मँडरिन चिनी, तमिळ. स्वातंत्र्यानंतर सिंगापूर सरकाराने अधिकृत प्रशासकीय व्यवहारात इंग्लिश भाषेचा पुरस्कार करण्याचे धोरण अवलंबले. सर्वसाधारणतः सर्व सरकारी पत्रके, दस्तऐवज इंग्लिश भाषेत जारी केले जातात; परंतु इतर भाषांतही बहुसंख्य पत्रके, दस्त भाषांतरित केले जातात. शिक्षणातही इंग्लिश ही ’प्रथम भाषा’ म्हणून शिकवली जाते व उर्वरित तीन अधिकृत भाषांपैकी एक भाषा ’द्वितीय भाषा’ म्हणून शिकता येते.
इंग्लिशखेरीज मँडरिन चिनी ही भाषिकसंख्येने दुसर्‍या क्रमांकाची मोठी भाषा आहे. सुमारे ७०% सिंगापुरी जनता द्वितीय भाषा म्हणून मँडरिन चिनी वापरते.

[संपादन] संस्कृती

[संपादन] प्रशासन व राजकारण

पार्लमेंट हाउस
पार्लमेंट हाउस

सिंगापुरात वेस्टमिन्स्टर व्यवस्थेवर आधारित संसदीय लोकशाही आहे. विविध मतदारसंघांचे प्रतिनिधित्व असणारी एकसभागृही संसद प्रशासनाचे कायदेमंडळ म्हणून काम करते. प्रशासनाचे बहुशः कार्यकारी अधिकार पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाखालील कॅबिनेट मंत्रिमंडळाकडे असतात. प्रशासनाच्या सर्वोच्चपदी असणारे सिंगापुराचे राष्ट्राध्यक्ष यांचे पद सर्वोच्च मानाचे असले तरीही अकार्यकारी स्वरूपाचे असते. मात्र इ.स. १९९१ पासून राष्ट्रीय राखीव निधीचा वापर व न्यायव्यवस्थेतील पदनियुक्त्यांबाबत नकाराधिकार वापरण्याचे अधिकार राष्ट्राध्यक्षांना बहाल करण्यात आले आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची लोकमतानुसार निवडणूक घेण्याची घटनात्मक तरतूद असली तरीही इ.स. १९९३ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता आजवर या पदावरील नेमणुका बिनविरोध निवडीनुसारच झाल्या आहेत.

[संपादन] अर्थतंत्र

[संपादन] बाह्य दुवे

[संपादन] सर्वसाधारण माहिती

[संपादन] नकाशे

इतर भाषांमध्ये


aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -