अमेरिकन डॉलर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अमेरिकन डॉलर हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने (किंवा अमेरिका) या राष्ट्राचे अधिकृत चलन आहे. तसेच भारतासह इतर अनेक राष्ट्रांत ते राखीव साठा चलन म्हणूनदेखील वापरले जाते. या चलनाच्या वितरणाचे नियंत्रण अमेरिकेच्या केंद्रीय रिझर्व बँक (Federal Reserve: इंग्रजी आवृत्ति) या संस्थेद्वारा केले जाते. या चलनासाठी $ हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, ISO 4217 (इंग्रजी आवृत्ति) प्रणालीनुसार अमेरिकन डॉलरचे चिन्ह USD असे असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund: इंग्रजी आवृत्ति) प्रमाणे संबोधन US$ असे आहे.
१९९५ साली ३८० अब्ज डॉलर चलनात होते, व त्यापैकी दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते. एप्रिल २००४ च्या अंदाजानुसार, सुमारे ७०० अब्ज (इंग्रजी बाह्यदुवा) इतके डॉलर चलनात होते, व तेव्हासुद्धा त्यापैकी सुमारे अर्धे ते दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते ( इंग्रजी बाह्यदुवा).
संयुक्त संस्थाने हा "डॉलर" या नावाचे चलन वापरणार्या अनेक देशांपैकी एक आहे. (इतर अनेक देशांची "डॉलर" या नावाची स्वतंत्र चलने आहेत. उदा. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, सिंगापुर, जमैका इ.) तसेच, अनेक राष्ट्रांमध्ये अमेरिकन डॉलर हे अधिकृत चलन आहे किंवा व्यवहारासाठी वैध चलन म्हणून मान्यताप्राप्त आहे. (पहा: डॉलर)
|
|
---|---|
मध्य आणि उत्तर | अफगाणिस्तानी अफगाणी · कझाकस्तानी टेंगे · किर्गिझस्तानी सोम · रशियन रुबल · ताजिकिस्तानी सोमोनी · तुर्कमेनिस्तानी मनत · उझबेकिस्तानी सोम |
पूर्व | मंगोलिया टॉगरॉग · चिनी युआन · हाँगकाँग डॉलर · जपानी येन · मकावनी पटाका · उत्तर कोरयीन वोन · नवीन तैवानी डॉलर · दक्षिण कोरयीन वोन |
आग्नेय | ब्रुनेई डॉलर · कंबोडियन रीयाल · इंडोनेशियन रुपीया · लाओ किप · मलेशियान रिंगिट · म्यानमारी क्यात · फिलिपीयन पेसोल · सिंगापूर डॉलर · थाई बात · अमेरिकन डॉलर (पश्चिम तिमूर) · व्हिएतनामी दोंग |
दक्षिण | बांगलादेशी टका · भूतानी न्गुल्त्रुम · भारतीय रुपया · मालदीवी रुफिया · नेपाळी रुपया · पाकिस्तानी रुपया · श्रीलंकन रुपया |
पश्चिम आणि मध्यपूर्व | आर्मेनियन द्राम · अझरबैजानी मनात · बहरैनी दिनार · सायप्रॉइट पाउंड · इजिप्शियन पाउंड · जॉर्जियन लारी · इराणी रियाल · इराकी दिनार · इस्राईली नवा शेकेल · जॉर्डनी दिनार · कुवैती दिनार · लेबनीझ लिरा · ओमानी रियाल · कतारी रियाल · सौदी रियाल · सिरियन पाउंड · तुर्कस्तानी नवा लिरा · संयुक्त अरब अमिराती दिनार · येमेनी रियाल |