हरिश्चंद्रगड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हरिश्चंद्रगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला पुणे नाशिक अहमदनगर या तिन जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित आहे.
किल्ला | |
---|---|
नाव | हरिश्चंद्रगड |
उंची | |
प्रकार | |
चढाईची श्रेणी | |
ठिकाण | अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था |
अनुक्रमणिका |
[संपादन] कोकणकडा
महाराष्ट्रातील इतर पारंपारिक किल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाहि. या किल्यावर प्राचीन लेणी आहेत तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातिल शिवमंदिर आहे. सह्याद्रितिल अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. या किल्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथिल कोकणकडा. ३००० फुटापेक्षाही उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा म्हणून ओळखला जातो. हा कडा इंग्रजीतील यु आकारात असुन इतर कड्यांसारखा ९० अंशात नसुन कॉनकेव्ह आकाराचा आहे. समोरुन बघितला तर नागाच्या फण्यासारखा हा कडा दिसतो.