कोतळीगड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कोतळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
किल्ला | |
---|---|
नाव | कोतळीगड |
उंची | ५०० मी. |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | पेठ |
डोंगररांग | - |
सध्याची अवस्था |
कर्जतपासून इशान्येस साधारण २१ कि.मी अंतरावर आणि नेरळ पासून पूर्वेस १८ कि.मी वर हा किल्ला आहे.
पेठ गावाच्या निकटतेमुळे याला ’पेठचा किल्ला’ असेही म्हणतात. हा किल्ला ’कोथळा’ या नावानेही ओळखतात. कर्जतहून खेड-कडूसकडे जाणार्या कोलिंबा व सावळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. माथेरानचे पठार, चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिधगड, माणिकगड, पिशाळगड असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत या किल्ल्याला फार महत्व होते. माणकोजी पांढ यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला, हे आपलेच लोक म्हणून प्रवेश दिला आणि त्यानी गडावरचं सैन्य कापून काढले.
हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. या किल्ल्याचे मिफ्ताहुलफ़तह असेही नामकरण करण्यात आले. पुढे नारोजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला जिंकुन घेण्याचा अयशस्वी प्रयास केला.
[संपादन] छायाचित्रे
[संपादन] गडावर जाण्याच्या वाटा
पेठ गावातून पाउलवाटेने वर चढत गेल्यावर थेट कातळकड्याच्या पोटात खोदलेल्या गुहा सामोर्या येतात. प्रथम लागते ती देवीची गुहा व पाण्याचे टाके व नंतर आकाराने मोठी असलेली भैरोबाची गुहा. या गुहेत छताला आधार देणारे कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. गुहेत ४-५ ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जुने तोफेचे गोळे आहेत. गुहेजवळच किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी एक उर्ध्वमुखी भुयारात पायर्या खोदल्या आहेत.
- मार्ग
- कर्जतहून कोठिंबे किंवा आंबिवली गावी बसने जाता येते. येथुन साधारणतः ४-५ तासात गडावर पोहचता येते.
[संपादन] बाह्यदुवे
- नकाशा : http://wikimapia.org/406669/