सिंधुदुर्ग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सिंधुदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये बांधलेला जलदुर्ग.
शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ व ४५ दगडी जिने आहेत.