इरशाळगड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
इरशाळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
किल्ला | |
---|---|
नाव | इरशाळ गड |
उंची | ३७०० फुट |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | अत्यंत कठीण |
ठिकाण | ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | कर्जत |
डोंगररांग | माथेरान |
सध्याची अवस्था |
इरशाळगड हा कर्जत विभागात येतो. कर्जत, मलंगगड, प्रबळगड हे सर्व कोकणात येणारे किल्ले आहेत. कल्याण - पुणे लोहमार्गावरुन जाताना मलंगगड, देवणीचा सुळका, माथेरान, पेब, म्हसमाळ, प्रबळगड, इरशाळगड हा परिसर सर्वांचे लक्ष वेधून घेतो. सर्वसामान्य जनजीवन असणार्या या भागात मुबलक पावसामुळे भाताची शेती फार मोठ्या प्रमाणावर होते. महामार्गापासून गड जवळच असल्याने पायथ्याच्या गावापर्यंत वाहनाची सोय होते.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
इरशाळ गडाचा तसा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. मे १६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलुख घेतला तेंव्हा त्यामध्ये हा गड देखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा.
[संपादन] छायाचित्रे
[संपादन] गडावरील ठिकाणे
तसे गडावर पाहण्यासारखे काही नाही. मात्र प्रस्तरारोहणाचा आनंद मात्र अवर्णीय आहे.
गडमाथ्यावरुन प्रबळगड, माथेरान, चंदेरी मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो.
[संपादन] गडावर जाण्याच्या वाटा
[संपादन] इतर
जेवणाची सोयः इरशाळवाडीत ५-६ लोकांची सोय होऊ शकते.
पाण्याची सोयः मार्च पर्यंत गडावरील टाक्यात पाणी असते.
वेळः इरशाळवाडीतून १ तास.
सूचना: अतिकठीण चढण असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. शिवाय, १०० फुटी रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे.