अचला
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
किल्ला | |
---|---|
नाव | अचला |
उंची | ४०४० फुट |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | नशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | पिंपरीपाडा |
डोंगररांग | सातमाळ |
सध्याची अवस्था |
अचला किल्ला हा अजंठा सातमाळ विभागात येतो. त्यामुळे नाशिकमार्गे किंवा मनमाडमार्गेही या किल्ल्यावर जाता येते. गुजरातहून सापुतारा मार्गे देखील जाता येते.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
अचला गडाबद्दल इतिहास उपलब्ध नाही.
[संपादन] छायाचित्रे
[संपादन] गडावरील ठिकाणे
गडमाथा अत्यंत अरुंद आहे. गडावर फारसे पाहण्यासारखे काही अवशेष नाहीत. गडावर पण्याची एक-दोन टाकी आहेत. याशिवाय भग्नावस्थेत असणारे एक मंदिर आहे.
[संपादन] गडावर जाण्याच्या वाटा
नाशिकमार्गे वणी गाठावे. वणीहून एस.टी. ने पिंपरी-अचलाकडे जावे. हे अंतर साधारणपणे १२ कि.मी. चे आहे. अचला गावात उतरून पिंपरीपाडा गावाकडे सरळ चालत जावे. हे अंतर अर्धा तासाचे आहे. पिंपरीपाडा हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावासमोरच्या डोंगरसोंडेवरील खिंडीत एक छोटेसे देऊळ दिसते त्याच्या दिशेने वर चढत जावे. डाव्या बाजूने किल्ल्याच्या नाकाडावरुन अंगावर येणारी वाट पकडावी. ही वाट पुढे कडा डावीकडे ठेवून त्याला चिटकून वर जाते. पुढे कातळात खोदलेल्या पायर्या लागतात. खिंडीतून माथा गाठण्यास अंदाजे दीड तास पुरतो.