अहिवंत
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अहिवंत हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
किल्ला | |
---|---|
नाव | अहिवंत |
उंची | ४००० फुट |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | वणी |
डोंगररांग | सातमाळ |
सध्याची अवस्था |
अहिवंत किल्ला अजंठा सातमाळ विभागात येतो. त्यामुळे नाशिकमार्गे अथवा मनमाड मार्गे या किल्ल्यावर जाता येते. तसेच, गुजरात सापुतारा मार्गेदेखील जाता येते.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
[संपादन] छायाचित्रे
[संपादन] गडावरील ठिकाणे
गडाचा माथा फार मोठा आहे. संपुर्ण माथा फिरण्यास १ दिवस लागतो. किल्ल्याच्या सोंडा पुर्व, पश्चिम, वायव्य आणि ईशान्येकडे मोठयाप्रमाणात पसरलेल्या आहेत. किल्ल्याच्या ईशान्य बाजुस एक गुहा आहे. पण ती राहण्यास योग्य नाही. दक्षिण बाजुला असणार्या कड्यामधील गुहा राहण्यास योग्य आहे. या गुहेपासून १० मिनिटाच्या अंतरावर पिण्याच्या पाण्याचे एक टाके आहे. दरेगावच्या बाजुने किल्ल्यावर पोहोचल्यास दोन पडक्या दरवाज्यांचे अवशेष दिसतात. आजूबाजुला अनेक मोठ्या पडक्या वाड्यांचे अवशेष पडलेले आहेत. यावरुन हा किल्ला मोठे लष्करीय ठाणे असावे असे वाटते. अनेक ठिकाणी महादेवाच्या पिंडीपण आढळतात. याबाजुच्या वाटेने किल्ल्यावर अनेक गुहा कोरलेल्या आढळतात. सध्या यांचा उपयोग मात्र गोठ्यासाठी होतो. गडावर फिरताना २-३ पाण्याची तळी आढळतात. एका मोठ्या तळ्यापाशी देवीची एक मोठी मुर्ती आढळते. या मुर्तीचे सप्तश्रुंगी देवीच्या मुर्तीशी साधर्म्य आढळते.
[संपादन] गडावर जाण्याच्या वाटा
नाशिक मार्गे: नाशिकमार्गे वणी गाठावे. वणीहुन नांदुरी रस्त्यावरुनच या किल्ल्याचे दर्शन होते. नांदुरी रस्त्याच्या अलिकडे १ कि.मी. अंतरावर एक ठळक वाट डावीकडे असणार्या डोंगरसोंडे पर्यंत जाते. येथुन वर चढुन गेल्यानंतर आपण एका खिंडीत पोहोचतो. समोर जंगलात शिरणारी वाट थेट गडाच्या पयथ्याशी जाते. खिंडीपासून गडावर जाण्यास १ तास लागतो.