विकिपीडिया
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
विकिपीडिया ([1]) हा एक मुक्त ज्ञानकोश आहे. विकी हे सॉफ्टवेअर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिमिडिया फाउंडेशन ही ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.
विकिपीडियाची सुरुवात २००१ साली इंग्रजी भाषेत झाली. आजही विकिपीडियाची इंग्रजी आवृत्ती (जिच्यात आत्तापर्यंत १५ लाख लेख लिहिले गेले आहेत) ही सर्वात विशाल व लोकप्रिय आवृत्ती आहे.
विकिपिडीया हा एक मुक्त ज्ञानकोश आहे. त्याचे स्वरुप स्वयंसेवी आहे. या मुक्त ज्ञानकोशाचे वैशिष्ट्य असे की ह्या ज्ञानकोशाचे कुणीही सहज संपादन करु शकते. इंटरनेट उपलब्ध असलेली कोणतीही व्यक्ति याच्यात लेख लिहू शकते वा लेखांमधील माहितीत सुयोग्य बदल घडवु शकते.
विकिपीडियाचा मुक्त ज्ञानकोश जगातील सर्व भाषांमध्ये लिहीला जात आहे. मराठीचा पण यात समावेश आहे. अनेक मराठी भाषिक यास हातभार लावत आहेत.
मराठी विकिपीडियावर (या पानानुसार) ७००० हुन अधिक लेख संपादित करण्यात आले आहेत, तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत आजतागायत एकूण ६० लाखांहून अधिक लेख जगातील विविध भाषात मिळुन लिहीले गेले आहेत.
विकिपिडीया, विकिपिडीयाची वैगुण्ये गृहित धरुन सुद्धा त्याच्या मुक्त सार्वत्रिक उपलब्धते मुळे, विवीध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणां मुळे आज इंटरनेट वरील सर्वाधिक वापरला जाणारा ज्ञानकोश झाला आहे. मराठीतील विकिपिडीया इतर भाषांप्रमाणेच गूगल सारखी शोधयंत्रे वापरुन शोधता येतो.
[संपादन] विकिपीडियाची वैशिष्ट्ये
- विकिपीडिआ:परिचय
- विकिपीडिया एवढा खास का आहे? (इंग्रजी आवृत्ती)
- नवागतांचे स्वागत (इंग्रजी आवृत्ती)
- विकिपीडिया
- इंग्रजी विकिपीडिया ओळख (इंग्रजी आवृत्ती)
- विकिपीडिया:सफर
- विकिपीडिया चे पाच आधारस्तंभ (इंग्रजी आवृत्ती)
[संपादन] बाह्य दुवे
- अलेक्सा पेज रॅंक
- गुगल ट्रेंड
- मराठी आणि विकिपीडिया तौलनिक गुगल ट्रेंड
- User page about ChaTo/Temporal Evolution of the Wikigraph