ठाणे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.
ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.
?ठाणे मुंबई • महाराष्ट्र • भारत |
|
|
|
|
|
गुणक: | |
प्रमाणवेळ | IST (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | ठाणे |
लोकसंख्या | १,२६१,५१७ (2001) |
सासंदीय मतदारसंघ | ठाणे |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४०० ६xx • +022 • MH-04 |
गुणक:
ठाणे हे ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ठाणे शहराचा कारभार ठाणे महानगरपालिका चालवते.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
ठाणे हे अतिशय जुने शहर आहे. ह्या शहराचे उल्लेख मध्ययुगीन काळातील शिलालेखात आणि ताम्रपटात सापडतात. हे शहर शिलाहार राजांची राजधानी होती. इटालियन प्रवासी मार्को पोलोने १२९० मध्ये ठाण्याला भेट दिली. ठाणे हे विकसित झालेले सुंदर शहर असल्याचा उल्लेख तो करतो. तसेच ठाणे हे मोठे बंदर असून तेथील व्यापारी कापूस, ताग आणि चामडे विकतात आणि घोडे खरेदी करतात असे तो म्हणतो.
पोर्तुगीज ठाण्यात १५३० मध्ये आले आणि त्यांनी शहरावर १७३९ पर्यंत सुमारे २०० वर्षे राज्य केले. मराठ्यांनी शहरावर १७३९ ते १७८४ राज्य केले. १७८४पासून स्वातंत्र्यापर्यंत शहर इंग्रजांच्या ताब्यात होते. भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर (आताचे मुंबई सी. एस. टी.) ते ठाणे दरम्यान १८५३ मध्ये धावली.
ठाणे महानगरपालिका १९८२ साली स्थापन झाली.
[संपादन] भौगोलिक स्थान
ठाणे हे मुंबईच्या उत्तरेकडे वसलेले आहे. ठाण्याचे क्षेत्रफळ १४७ वर्ग कि. मी. आहे. ठाण्याला तळ्यांचे शहर असेही म्हणतात. ठाण्यातला मासुंदा तलाव हा सर्वात सुंदर आहे. ठाणे परिसरात अनेक निसर्गरम्य टेकड्या आणि डोंगर आहेत.
[संपादन] संस्कृती
ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात. गणेशोत्सव आणि नवरात्र हे ठाण्यातील मुख्य उत्सव आहेत. ठाण्यातले गडकरी रंगायतन विविध नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे माहेरघर आहे. ठाण्यातील राम मारूती रस्ता आणि गोखले रस्ता हे उपहारगृहे , कपडे, पुस्तके, संगणक ह्यांच्या दुकानांसाठी प्रसिद्ध आहेत.
कुंजविहार आणि राजमाता ह्यांचे वडापाव आणि टिप-टॉपचे खाद्यपदार्थ आणि मिठाई विशेष प्रसिद्ध आहेत.
ठाण्यात आता विविध मल्टिप्लेक्स थियेटर्स आणि शॉपिंग मॉल्स आहेत.
[संपादन] वाहतूक व्यवस्था
ठाणे शहरात ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) शहर वहातूक व्यवस्था पुरवते. बेस्ट ठाण्याच्या तीन हात नाक्यापासून मुंबईत बससेवा पुरवते. नवी मुंबई परिवहन (एन. एम. एम. टी.) ठाण्यातील चेंदणी नाक्यापासून नवी मुंबईत बससेवा पुरवते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस. टी.) ठाणे ते बोरिवली, भायंदर, पनवेल ह्या मध्यम पल्ल्याच्या सेवा आणि इतर शहरांसाठी लांब पल्ल्याच्या बससेवा पुरवते.
ठाणे हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. ठाणे - वाशी ही लोकलसेवा नवीन सुरु झाली आहे.
[संपादन] पर्यटनस्थळे
गडकरी रंगायतन, मासुंदा तलाव, गोखले रस्ता, राम मारूती रस्ता, येऊर, उपवन
[संपादन] ठाणे शहर बाह्यदुवे
[संपादन] स्रोत व आभार
ठाण्याचा हा लेख मूळ इंग्रजी विकिपीडियाच्या Thane या लेखावर आधारित आहे.
ठाणे जिल्ह्यातील तालुके |
---|
ठाणे शहर | वसई | कल्याण | मुरबाड | भिवंडी | शहापूर् | वाडा | जव्हार | मोखाडा | पालघर | डहाणू | तलासरी | उल्हासनगर | अंबरनाथ | विक्रमगड |
|
||
---|---|---|
राजधानी | मुंबई | |
विषय | इतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन | |
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशिम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर | |
मुख्य शहरे | औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • सोलापूर • धुळे | |
मुख्यमंत्री | वाय. चव्हाण · एम. कन्नमवार · वी. नाईक · एस. चव्हाण · वी. पाटील · एस. पवार · ए. आर. अंतुले · बी. भोसले · एस. निलंगेकर · एस. नाईक · एम. जोशी · एन. राणे · वी. देशमुख · एस. शिंदे |
ठाणे | |||
दूरध्वनी क्र.- +९१-२२- | फॅक्स क्र.-+९१-२२- | ई-मेल पत्ता- | संकेत स्थळ- |
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: मुलुंड |
मुंबई उपनगरी रेल्वे | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: कळवा |
|
स्थानक क्रमांक:१९ | मुंबई सीएसटीपासूनचे अंतर {{{अंतर}}} कि.मी. |
स्थानकावरील सुविधा | |||
मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य वरची स्थानके |
मुंबई सीएसटी | मस्जिद बंदर | सँडहर्स्ट रोड । भायखळा । चिंचपोकळी । करी रोड । परळ । दादर । माटुंगा । शीव । कुर्ला । विद्याविहार । घाटकोपर । विक्रोळी । कांजुरमार्ग । भांडुप । नाहूर । मुलुंड । ठाणे । कळवा । मुंब्रा । दिवा । डोंबिवली ।ठाकुरली |कल्याण |
ठाणे | |||
दूरध्वनी क्र.- +९१-२२- | फॅक्स क्र.-+९१-२२- | ई-मेल पत्ता- | संकेत स्थळ- |
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: ऐरोली |
मुंबई उपनगरी रेल्वे | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: [[]] |
|
स्थानक क्रमांक:२३ | मुंबई सीएसटीपासूनचे अंतर ' कि.मी. |
स्थानकावरील सुविधा | |||
वृत्तपत्र विक्रेता | दूरध्वनी | पोलिस सहायता कक्ष | रेल्वे आरक्षण केन्द्र |
टॅक्सी तळ | खाद्य-पेय विक्रेता |
मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य(हार्बर) वरची स्थानके |
मुंबई सीएसटी | मस्जिद बंदर | सँडहर्स्ट रोड । डॉकयार्ड रोड | रे रोड | कॉटन ग्रीन | शिवडी वडाळा रोड | गुरु तेग बहादूर नगर | चुनाभट्टी | कुर्ला | टिळकनगर | चेंबुर | गोवंडी | मानखुर्द | वाशी | सानपाडा | जुईनगर | नेरूळ | सीवूड्स | सी.बी.डी. बेलापूर | खारघर | मानसरोवर | खांदेश्वर | पनवेल वडाळा रोड | किंग्ज सर्कल | माहीम | वांद्रे | खार रोड | सांताक्रुझ | विले पार्ले | अंधेरी |