धूमकेतू
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
धूमकेतू म्हणजे उल्कांसारखाच असणारा पण बर्फापासून बनलेला केरसुणीसारखा दिसणारा खगोलशास्त्रीय पदार्थ आहे. धूमकेतू अती लंबगोलाकृती कक्षेत सूर्याभोवती फिरतात व ते प्लुटो ग्रहाच्याही पुढे जातात. धूमकेतूंमध्ये घन कार्बन डायऑक्साईड, मिथेन, पाणी आणि इतर बरेच क्षार मिसळलेले असतात.
धूमकेतू सूर्यापासुन अतीदूर अंतरावर असलेल्या ढगांपासून तयार होतात असे समजले जाते. असे ढग सौर तारागर्भापासून(Solar nebula) बनलेल्या घन कचर्यापासून तयार झालेले असतात. उल्का वेगळ्या पद्धतीने तयार होतात पण अती थंड धूमकेतूही त्यातील अस्थिर वायू/बाष्प संपल्यावर उल्केप्रमाणे बनतात.