देवयानी दीर्घिका
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
महाभारत किंवा पुराणामधील व्यक्तिरेखेकरीता पहा: देवयानी
देवयानी दीर्घिका (Andromeda Galaxy) ही सर्पिलाकार दीर्घिका असून ती आपल्यापासून सुमारे २.५ दशलक्ष प्रकाश वर्षे अंतरावर आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] निरिक्षणाचा इतिहास
[संपादन] सर्वसाधारण माहिती
देवयानी दिर्घिका ही ३०० कि.मी. प्रती सेकंद या वेगाने सूर्याजवळ येत आहे, यामुळे नीलस्मृती असणार्या दिर्घिकांपैकी हि एक दिर्घिका आहे. आपल्या सौरमालेचा आकाशगंगेतील वेग वगळता पाहिल्यास असे आढळते कि देवयानी व आपली आकाशगंगा दिर्घिका या एकमेकींकडे १०० ते १४० कि. मी. प्रती सेकंद या वेगाने जवळ आहेत. याचा अर्थ असा नाही कि या दोन्ही दिर्घिका एकमेकींना धडकतीलच कारण कि अजून आपल्याला टॅंजंन्ट व्हेलॉसिटी माहित नाही. पण जर का धडक झालीच तर ती ३ अब्ज वर्षांनी होईल. या घटनेनंतर या दोन दिर्घिका एक होऊन एकच महाकाय अशी लंबगोलाकार दिर्घिका तयार होईल. या प्रकारच्या घटना दिर्घिकांच्या समुहात सतत घडत असतात.