जागतिक बँक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जागतिक बँकेची (इंग्रजी: World Bank) स्थापना इ.स. २७ डिसेंबर १९४५ मध्ये झाली. ब्रेटन वुडस् पद्धती (इंग्रजी: Bretton Woods System) समितीच्या जागतिक आर्थीक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. अविकसित देश व विकसनशील देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बंकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले. गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विषेश प्रयत्नशील आहे.
जागतिक बँकेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.
- सरकारांचे सबलीकरण व सरकारी अधिकार्यांना प्रशिक्षण
- अर्थव्यवस्थांचा विकास
- भ्रष्टाचार निर्मुलन
- गरीबी हटाव
- संशोधन व शिक्षण
शिक्षणासाठी जागतिक बँक विषेश परिश्रम घेते. या साठी आंतरजालाधारीत प्रशिक्षण ((इंग्रजी: Online Training) व इतर पर्यायांचा उपयोग केला जात आहे. भारता सहीत अनेक देशांना या बँकेने विवीध प्रकल्पासाठी कर्जे दिली आहेत. पैकी भारतातील गुजरात मधील नर्मदा नदी वरील विवादास्पद धरण सरदार सरोवर प्रकल्पाचे कर्ज या बेंकेने प्रकल्पातील धोके दिसून आल्याने परत घेतली आहे. इ.स. १९९८ सालातल्या मंदीच्या काळात या जागतिक बँकेने मेक्सिको व इंडोनेशिया या देशांना दिलेला सल्ला आर्थीक दॄष्ट्या अतिशय धोक्याचा ठरला आहे.
[संपादन] बाह्यदुवे
[संपादन] विरोधी बाजू
याच वेळी बॅंकेचे विरोधक असेही म्हणतात की बँकेची काही लपवलेली उद्दीष्टेही आहेत. जसे की दुसर्या महायुद्धा नंतर साम्राज्य लयाला जात चाललेल्या इंग्लंड ला नवीन आर्थीक साम्राज्य उभारण्यासाठी या बॅंकेचा उपयोग करून घेतला आहे. बँकेचे माजी अध्यक्ष व अर्थतज्ञ जोसेफ स्तिगलित्झ (इंग्रजी:Joseph E. Stiglitz) यानीही इ.स. १९९९ मध्ये बँकेच्या उद्दीष्टांशी सुसंगत नसलेल्या धोरणांवर टीका केली होती.