मे २
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मे २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२२ वा किंवा लीप वर्षात १२३ वा दिवस असतो.
<< | मे २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ||||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ||
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | ||
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | ||
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ | ||
चैत्र/वैशाख शके १९३० |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] सोळावे शतक
- १५६८ - मेरी स्टुअर्ट लॉक लेवेन तुरुंगातुन पळाली.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०८ - फ्रेंच आक्रमकांविरुद्ध माद्रिदमध्ये जनतेचा उठाव.
- १८२९ - चार्ल्स फ्रीमॅन्टलने ऑस्ट्रेलियातील स्वान रिव्हर वसाहतीची स्थापना केली.
- १८६६ - कॅलावची लढाई - पेरूच्या सैन्याने स्पेनच्या आरमाराचा पराभव केला.
- १८८५ - कट नाईफची लढाई - क्री व एसिनिबॉइन जमातीच्या स्थानिक रहिवाश्यांनी कॅनडाच्या सैन्याचा पराभव केला.
- १८८५ - बेल्जियमचा राजा लिओपोल्ड दुसर्याने कॉँगोच्या राष्ट्राची निर्मिती केली.
- १८८९ - इथियोपियाचा सम्राट मेनेलिक दुसर्याने इटलीशी संधी केली व एरिट्रिया इटलीच्या हवाली केले.
[संपादन] विसावे शतक
- १९१८ - जनरल मोटर्सने डेलावेरमधील शेवरोले मोटर कंपनी विकत घेतली.
- १९३३ - जर्मनीत ऍडोल्फ हिटलरने ट्रेड युनियन वर बंदी घातली.
- १९४५ - दुसरे महायुद्ध-बर्लिनची लढाई - सोवियेत संघाने बर्लिनचा पाडाव केला व जर्मन संसदेवर आपला झेंडा फडकवला.
- १९५३ - हुसेन जॉर्डनच्या राजेपदी.
- १९६४ - व्हियेतनाम युद्ध - साइगॉनच्या बंदरात अमेरिकेची युद्धनौका यु.एस.एस. कार्ड बुडाली.
- १९६९ - क्वीन एलेझाबेथ सेकंड या राजेशाही जहाजाची पहिली सफर सुरू.
- १९८२ - फॉकलंड युद्ध - युनायटेड किंग्डमच्या एच.एम.एस. कॉँकरर या पाणबुडीने आर्जेन्टिनाची युद्धनौका ए.आर.ए. जनरल बेल्ग्रानो बुडवली.
- १९९७ - टोनी ब्लेर युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- १९९९ - मिरेया मॉस्कोसो पनामाच्या पंतप्रधानपदी. मॉस्कोसो पनामाची सर्वप्रथम स्त्री पंतप्रधान आहे.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १३६० - यॉँगल, चीनी सम्राट.
- १७२९ - कॅथेरिन, रशियाची सम्राज्ञी.
- १८९२ - मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेन, जर्मन लढाउ वैमानिक.
- १९०३ - डॉ.बेन्जामिन स्पॉक, अमेरिकन बालरोगतज्ञ.
- १९२० - डॉ. वसंतराव देशपांडे, गायक व संगीतकार.
- १९२१ - सत्यजित रे, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- १९३५ - फैसल दुसरा, इराकचा राजा.
- १९६० - रवि रत्नायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - ब्रायन लारा, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७५ - डेव्हिड बेकहॅम, इंग्लिश फुटबॉल खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ७५६ - शोमु, जपानी सम्राट.
- ९०७ - बोरिस पहिला, बल्गेरियाचा राजा.
- १५१९ - लिओनार्डो दा व्हिन्ची, इटलीचा चित्रकार, संशोधक.
- १९५७ - जोसेफ मॅककार्थी, अमेरिकन सेनेटर.
- १९६९ - फ्रांझ फोन पापेन, जर्मन चान्सेलर.
- १९७२ - जे. एडगर हूवर, अमेरिकेच्या एफ.बी.आय. या पोलिस संस्थेचा संचालक.
- १९७३ - दिनकर केशव बेडेकर, मराठी समीक्षक आणि विचारवंत.
- १९७५ - शांताराम आठवले, चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि लेखक.
- १९९८ - पुरूषोत्तम काकोडकर, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि कॉंग्रेस नेते.
- १९९९ - पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर, जयपूर घराण्याचे गायक.
- २००१ - मोहनलाल पिरामल, भारतीय उद्योगपती.
- २००५ - वी किम वी, सिंगापूरचा राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- ध्वज दिन - पोलंड.
- शिक्षक दिन - ईराण.
- शिक्षण दिन - ईंडोनेशिया.
एप्रिल ३० - मे १ - मे २ - मे ३ - मे ४ - (मे महिना)