जून २
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | जून २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ||
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | ||
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | ||
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | ||
२९ | ३० | |||||||
वैशाख / ज्येष्ठ शके १९३० |
जून २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५३ वा किंवा लीप वर्षात १५४ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] पाचवे शतक
[संपादन] सहावे शतक
- ५७६ - बेनेडिक्ट पहिला पोपपदी.
[संपादन] सातवे शतक
- ६५७ - संत युजीन पहिला पोपपदी.
[संपादन] सतरावे शतक
- १६१५ - रुआचे रिकोले धर्मप्रसारक कॅनडात क्वेबेक सिटी येथे पोचले.
[संपादन] अठरावे शतक
- १७७४ - ब्रिटीश सैनिकांना अमेरिकेतील वसाहतीत कोणाच्याही घरात कधीही शिरायची मुभा.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०० - कॅनडातील न्यू फाउंडलंड प्रांतात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.
- १८९६ - गुग्लियेमो मार्कोनीला रेडियो साठी पेटंट बहाल.
- १८९७ - आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेनने न्यू यॉर्क टाईम्सला सांगितले - माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे.
[संपादन] विसावे शतक
- १९०९ - आल्फ्रेड डीकिन तिसर्यांदा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.
- १९२४ - देशाच्या हद्दीत राहणार्या अमेरिकेतील मूळ रहिवाश्यांना अमेरिकेचे नागरिकत्त्व बहाल केले गेले.
- १९४६ - राजा उंबेर्तो दुसर्याला हटवून इटलीने राजेशाही संपवली व स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
- १९५३ - इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ दुसरीला राज्याभिषेक.
- १९६५ - व्हियेतनाम युद्ध - ऑस्ट्रेलियाचे सैनिक दक्षिण व्हियेतनाममध्ये उतरले.
- १९८५ - खूनी लिओनार्ड लेकला सान फ्रांसिस्को येथे दुकानातुन वस्तु चोरल्याबद्दल अटक.
- १९९५ - बॉस्नियाने अमेरिकेचे लढाउ विमान पाडले.
- १९९९ - भुतानमध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू.
[संपादन] एकविसावे शतक
- २००३ - मंगळ ग्रहाचा अधिक अभ्यास करण्यासाठी मार्स एक्सप्रेस प्रोब हे उपकरण अवकाशयानाद्वारे सोडण्यात आले.
[संपादन] जन्म
- ९२६ - मुराकामी, जपानी सम्राट.
- १५३५ - पोप लिओ अकरावा.
- १७३१ - मार्था वॉशिंग्टन, अमेरिकेचा प्रथम राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनची पत्नी.
- १८३५ - पोप पायस दहावा.
- १८६५ - जॉर्ज लोहमन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०७ - विष्णू विनायक बोकील, मराठी नाटककार, लेखक.
- १९२९ - नर्गिस दत्त, भारतीय अभिनेत्री.
- १९३० - पीट कॉन्राड, अमेरिकन अंतराळवीर.
- १९४० - कॉन्स्टन्टाईन दुसरा, ग्रीसचा राजा.
- १९४३ - ईलया राजा, भारतीय संगीतकार.
- १९६५ - स्टीव वॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - मार्क वॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - गाटा काम्स्की, अमेरिकन बुद्धिबळपटू.
[संपादन] मृत्यू
- १७९५ - राणी अहिल्याबाई होळकर.
- १८८२ - ज्युसेप्पे गॅरिबाल्डी, इटलीचा क्रांतीकारी.
- १९५८ - कर्ट आल्टर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता
- १९८२ - फझल इलाही चौधरी, पाकिस्तानी राजकारणी.
- १९८४ - नाना पळशीकर, भारतीय अभिनेता
- १९८८ - राज कपूर, भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
मे ३१ - जून १ - जून २ - जून ३ - जून ४ (जून महिना)