इ.स. १९५७
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे |
वर्षे: | १९५४ - १९५५ - १९५६ - १९५७ - १९५८ - १९५९ - १९६० |
वर्ग: | जन्म - मृत्यू शोध - निर्मिती - समाप्ती |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी २ - सिंधु नदी वरच्या गुड्डु बंधार्याचे पाकिस्तानमध्ये भूमिपूजन.
- फेब्रुवारी १७ - अमेरिकेत वॉरेंटन, मिसुरी येथील वृद्धाश्रमात आग. ७२ ठार.
- मे १५ - युनायटेड किंग्डमने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली.
- जून २७ - अमेरिकेच्या टेक्सास व लुईझियाना राज्यात हरिकेन ऑड्रीचा धुमाकूळ. ५०० ठार.
- जुलै ११ - करीम हुसेनी आगाखान इस्माइलीपंथाच्या प्रमुखपदी.
- जुलै २६ - ग्वाटेमालाच्या हुकुमशहा कार्लोस कॅस्टियो अर्मासची हत्या.
- ऑगस्ट १ - अमेरिका व कॅनडाने उत्तर अमेरिकी हवाई संरक्षण कमांड (नोरॅड)ची रचना केली.
- डिसेंबर १६ - ई.ई.चुंदरीगरने राजीनामा दिल्यावर सर फिरोजखान नून पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी.
[संपादन] जन्म
- मे ४ - पीटर स्लीप, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- जून ६ - माईक गॅटिंग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जून ७ - नील रॅडफोर्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ३ - मणी शंकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- ऑगस्ट ९ - मेलानी ग्रिफिथ, अमेरिकन अभिनेत्री.
- ऑगस्ट १६ - रणधीरसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट २८ - डॅनियेल स्टर्न, अमेरिकन अभिनेता.
- सप्टेंबर १४ - केप्लर वेसल्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २७ - बिल ऍथी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २९ - क्रिस ब्रोड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- जानेवारी १६ - आर्तुरो तोस्कानिनि, इटालियन संगीतकार.
- फेब्रुवारी ८ - जॉन फोन न्यूमन, हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, संगणकशास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ.
- मे २ - जोसेफ मॅककार्थी, अमेरिकन सेनेटर.
- जून २१ - योहानेस श्टार्क, नोबेल पारितोषिकविजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- ऑगस्ट ४ - वॉशिंग्टन लुइस परेरा दि सूसा, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- सप्टेंबर २१ - हाकोन सातवा, नॉर्वेचा राजा.