विश्वनाथन आनंद
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
विश्वनाथन आनंद | ||
---|---|---|
पुर्ण नाव | विश्वनाथन आनंद | |
देश | ||
जन्म | डिसेंबर ११ १९६९ Chennai, India |
|
पद | ग्रँडमास्टर -१९८८ | |
विश्व अजिंक्यपद | २०००-२००२ (फिडे), २००७-सद्य (अविवादीत) | |
फिडे गुणांकन | २७९९ (क्र. २, जानेवारी २००८ फिडे गुणांकन यादी) |
|
सर्वोच्च गुणांकन | २८०३ (एप्रिल २००६) |
विश्वनाथन आनंद हा भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे व तो सध्याचा जग्गजेता आहे. FIDE फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेसच्या ऑक्टोबर २००७ च्या क्रमवारीनुसार तो जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू आहे. मेक्सिको शहरात झालेली जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून तो २९ सप्टेंबर २००७ रोजी जग्गजेता झाला. आनंदने ह्या स्पर्धेत १४ पैकी ९ गुण मिळविले. तो ह्या स्पर्धेत एकही सामना हरला नाही. त्याने इतर स्पर्धकांपेक्षा एक पूर्ण गुण अधिक मिळवला.