स्वामी विवेकानंद
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
स्वामी विवेकानंद | |
पूर्ण नाव | विवेकानंद नरेंद्रनाथ दत्त(संन्यासाश्रमापूर्वी) |
जन्म | जानेवारी १२, १८६३ कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत |
मृत्यू | जुलै ४, १९०२ बेलूर, कोलकाता, भारत |
भाषा | बंगाली, इंग्लिश |
प्रमुख विषय | वेदान्त, योग |
प्रभाव | रामकृष्ण परमहंस |
स्वामी विवेकानंद (जानेवारी १२, १८६३ - जुलै ४, १९०२) हे भारताचे थोर संत व नेते होते.
विवेकानंद ह्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य व वारसदार होते. श्री रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.
१८९३ साली अमेरिकेतील शिकागो शहरात सर्वधर्मीय परिषद भरली होती. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली.
जुलै ४ १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर विवेकानंद स्मारक उभे आहे.