विमानतळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
विमानतळ (इंग्लिश:Airport) :असे स्थान जे विमान उड्डाणाकरीता वापरले जाते. विमानाने आकाशात भरारी मारण्यासाठी व उतरण्यासाठी ज्या विशेष सोयी लागतात त्या विमानतळावर उपलब्ध असतात. मोठी विमानतळे प्रवाशांच्या आगमन व निर्गमनाकरीता साठी वापरली जातात. विमानांचे निर्वहन व दुरुस्ती काही विमानतळावर करण्यात येते.
विमानतळावर असलेली धावपट्टी विमान-उड्डाणासाठी बनवलेली असते. जगातील पहिले नागरी विमानतळ अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशातील न्युजर्सी राज्यातील न्युअर्क (Newark)या ठिकाणी बांधला गेला.