See also ebooksgratis.com: no banners, no cookies, totally FREE.

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
रिचर्ड बर्टन - विकिपीडिया

रिचर्ड बर्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅप्टन सर रिचर्ड फ्रान्सिस बर्टन (१९ मार्च १८२१- २० ऑक्टोबर १८९०) हे १९ व्या शतकातील एक प्रसिद्ध ब्रिटीश व्यक्तिमत्व आहे. कॅप्टन सर बर्टन हे भारतात मुख्यत्वे वात्सायनाचे कामसुत्र या प्राचीन भारतीय ग्रंथाचे इंग्रजी भांषातर करणारे व या ग्रंथातील ज्ञान सर्व सामान्यांपर्यंत तसेच जगात पोहोचवणारे म्हणून परिचित आहेत. परंतु ब्रिटन मध्ये केवळ भाषांतरकार म्हणून नव्हे तर लष्करातील अधिकारी, लेखक, शोधक, भूगोल तज्ञ, भाषा तज्ञ, कवी, उत्कृष्ट वक्ता, तलवार बाज तसेच राजकिय दुत असे विविधरंगी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची कामगीरी म्हणजे अशिया व अफ्रिकेतील नाईल नदीचे उगम स्थान शोधुन काढणार्‍या मोहिमेचे त्यांनी केलेले नेतृत्व. बर्टन यांना अनेक भारतीय, अरबी व युरोपीय मिळुन २९ भाषा अवगत होत्या.

अफ्रिकेतील साहसाबरोबरच बर्टन यांनी मक्के मध्ये वेष बदलुन अरबी संस्कृतीचा अभ्यास केला या दरम्यान त्यानी प्रसिद्ध अरबी परिकथा ज्या आज अरेबियन नाईट्स म्हणून ओळखल्या जातात, त्यांचे इंग्रजी भाषांतर केले. भारतात त्यांची इस्ट इंडिया कंपनी मध्ये कॅप्टन म्हणून त्यांची रवानगी झाली होती. याच काळात त्यांनी कामसुत्र सारख्या ग्रंथाचा अभ्यास केला. त्यांनी लंडन येथे कामशास्त्र सोसायटीची स्थापना केली. १८६० च्या दर्म्यान त्यांची रवानगी अफ्रिकेत झाली व त्या नंतर त्यांनी रॉयल जिओग्राफिकल सोसायटीच्या सहकार्याने नाईल नदीच्या उगमाच्या शोधमोहिमेचे नेतृत्व केले. त्या नंतर त्यांनी ब्रिटनचे दूत म्हणून अनेक देशात कामगीरी बजावली. त्यांच्या आयुष्यभराच्या कामगीरीवर १८८६ मध्ये त्यांना सर किताब देण्यात आला.


[संपादन] चित्रपटात

माउंटन्स ऑफ द मून - रिचर्ड बर्टन व जॉन हेमिंग स्पिक यांच्या नाईल मोहिमे वर आधारित हा चित्रपट आहे. बर्टन व स्पिक यांच्या मोहिमेचे मुद्देसुद सुरेख चित्रण तसेच मोहिमे नंतर दोघांमध्ये निर्माण झालेला तणाव या चित्रपटात आहे.


aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -