राहुल द्रविड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
राहुल शरद द्रविड (जन्म जानेवारी ११, इ.स. १९७३, इंदूर, मध्य प्रदेश) हा भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचा वर्तमान कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला इ.स. १९९६ मध्ये सुरूवात केली. जगातील सर्वोत्तम फलंदाजांत एक गणला जातो.
राहुल द्रविड | ||||
भारत | ||||
व्यक्तिगत माहिती | ||||
---|---|---|---|---|
पूर्ण नाव | राहुल शरद द्रविड | |||
जन्म | जानेवारी ११ १९७३ | |||
इंदूर, मध्य प्रदेश), भारत | ||||
फलंदाजीची पद्धत | उजखोरा | |||
गोलंदाजीची पद्धत | Right arm off spin | |||
आंतरराष्ट्रीय माहिती | ||||
क.सा. पदार्पण | २० जून १९९६: v इंग्लंड | |||
शेवटचा क.सा. | १३ ऑगस्ट २००७: v इंग्लंड | |||
आं.ए.सा. पदार्पण | ३ एप्रिल १९९६: v श्रीलंका | |||
शेवटचा आं.ए.सा. | १४ ऑक्टोबर २००७: v ऑस्ट्रेलिया | |||
एकदिवसीय शर्ट क्र. | १९ | |||
राष्ट्रीय स्पर्धा माहिती | ||||
वर्ष | संघ | |||
१९९० – present | कर्नाटक | |||
२००३ | Scotland | |||
२००० | Kent | |||
कारकिर्दी माहिती | ||||
Tests | ए.सा. | प्र.श्रे. | लि.अ. | |
सामने | ११२ | ३३३ | २२८ | ४३४ |
धावा | ९४९२ | १०५८५ | १८२४० | १४६७१ |
फलंदाजीची सरासरी | ५६.५० | ३९.४९ | ५७.०० | ४२.२७ |
शतके/अर्धशतके | २४/४८ | १२/८१ | ४९/९५ | २०/१०८ |
सर्वोच्च धावसंख्या | २७० | १५३ | २७० | १५३ |
चेंडू | १२० | १८६ | ६१७ | ४७७ |
बळी | १ | ४ | ५ | ४ |
गोलंदाजीची सरासरी | ३९.०० | ४२.५० | ५४.६० | १०५.२५ |
एका डावात ५ बळी | – | – | ० | – |
एका सामन्यात १० बळी | – | n/a | – | n/a |
सर्वोत्तम गोलंदाजी | १/१८ | २/४३ | २/१६ | २/४३ |
झेल/यष्टीचीत | १५३/– | १९३/१४ | २६८/१ | २२७/१७ |
३ नोव्हेंबर, इ.स. २००७ |
[संपादन] व्यक्तिगत
विजेता पेंढारकर या नागपूर स्थित डॉक्टरशी विवाहबद्ध.
[संपादन] आंतरराष्ट्रीय कारकीर्द
राहुल द्रविडने आपल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९९६-९७ च्या मोसमात श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यात केली. विनोद कांबळीच्या स्थानावर द्रविडचा संघात समावेश केला गेला. सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये केवळ २१ धावांच्या कामगिरीमुळे द्रविडला एकदिवसीय संघातले आपले स्थान गमवावे लागले. संजय मांजरेकरच्या दुखापतीमुळे द्रविडला इंग्लंड दौर्याच्या दुसर्या कसोटीत संधी मिळाली. त्याने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात ९५ धावांची सुरेख खेळी केली. मांजरेकरच्या पुनरागमनानंतरही द्रविडने कसोटी संघातले आपले स्थान राखले. १९९६-९७ च्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यात जोहान्सबर्गच्या कसोटीत तिसर्या क्रमांकावर खेळताना द्रविडने आपले पहिले कसोटी शतक झळकावले. या सामन्यात १४७ आणि ८१ धावांच्या बहारदार कामगिरीबद्दल त्याला सामनावीर घोषित केले गेले. याच मोसमात त्याने एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुध्द खेळताना आपले पहिले अर्धशतक फटकावले.
पहिल्या १८ महिन्यांत द्रविडने ५६.७ च्या सरासरीने ९६४ धावा जमवल्या. १९९९च्या सुरुवातीस न्यूझीलंडविरुध्दच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतकी खेळी करून विजय हजारे आणि सुनील गावसकर यांच्यानंतर असा पराक्रम करण्याची कामगिरी केली. या सामन्यात द्रविडने तब्बल ६५३ मिनिटे किल्ला लढवून १९० आणि नाबाद १०३ धावा काढल्या आणि भारताला तो सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळाले. धावफलक
२००१ च्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्यातील दुसर्या कसोटीतील १८० धावांची खेळी आणि व्ही.व्ही.एस्. लक्ष्मण बरोबर पाचव्या गड्यासाठीची भागीदारी भारताच्या विजयात अत्यंत मोलाची ठरली. त्या सामन्यात भारताने फॉलो-ऑन मिळाला असतानाही विश्वविजेत्या संघावर विजय मिळवला.
(अपूर्ण)
मागील: सौरव गांगुली |
भारतीय क्रिकेट संघाचे नायक - |
पुढील: महेन्द्रसिंग धोणी |
|
---|
राहुल द्रविड • सुनील गावसकर • सचिन तेंडुलकर • विरेंद्र सेहवाग • विनोद कांबळी |
|
---|
सचिन तेंडुलकर • सनत जयसूर्या • इंजमाम उल-हक • सौरव गांगुली • राहुल द्रविड • ब्रायन लारा • रिकी पाँटिंग |
|
|
---|---|
१ अझहरुद्दीन (c) • २ तेंडुलकर • ३ गांगुली • ४ द्रविड • ५ जडेजा • ६ खुरासिया • ७ मोंगिया (wk) • ८ श्रीनाथ • ९ प्रसाद • १० आगरकर • ११ रॉबिन सिंग • १२ चोप्रा • १३ कुंबळे • १४ मोहंती • १५ रमेश • प्रशिक्षक: गायकवाड |
|
|
---|---|
१ गांगुली (c) • २ द्रविड (wk) • ३ सेहवाग • ४ तेंडुलकर • ५ कुंबळे • ६ हरभजन • ७ श्रीनाथ • ८ खान • ९ नेहरा • १० मोंगिया • ११ पटेल (wk) • १२ बांगर • १३ आगरकर • १४ युवराज • १५ कैफ • प्रशिक्षक: राईट |
|
|
---|---|
३ हरभजन • ७ धोणी • १० तेंडुलकर • १२ युवराज • १३ पटेल • १९ द्रविड(c) • २१ गांगुली • २७ उतप्पा • ३४ खान • ३६ श्रीसंत • ३७ कुंबळे • ४४ सेहवाग • ५६ पठाण • ६८ आगरकर • ९९ कार्तिक • प्रशिक्षक: ग्रेग चॅपल |
|
---|
2 स्टाइन • 3 कॅलिस • 5 कोहली • 6 चंदरपॉल • 7 जाफर • 8 प्रवीण • 9 बाउचर • 10 कुंबळे • 13 ब्रॅकेन • 14 अरूण कुमार • 18 व्हाइट • 19 द्रविड (c) • 21 टेलर • 22 मिस्बाह • 23 विनय कुमार • 24 जोशी • 27 चिपली • 29 नोफ्के • 34 खान • 36 गोस्वामी • 41 रझाक • 66 पाटील • 77 अखिल • अयप्पा • अप्पाना • प्रशिक्षक प्रसाद |