पंचमहाभूते
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सांख्यदर्शनानुसार सर्व भौतिक जग (दृश्य विश्व), सजीव व निर्जीव पदार्थ, आपले शरीर हे पाच मूळ तत्त्वांपासून (द्रव्यांपासून) तयार झाले आहे असे मानले जाते.
या पाच तत्त्वांना पंचमहाभूते असे म्हणतात.
हिंदू धर्मातील तत्त्वज्ञानावर प्राचीन सांख्यदर्शन या शास्त्राचा मोठा प्रभाव आहे.
ही मूळतत्वे खालील प्रमाणे आहेत.
अनुक्रमणिका |
[संपादन] पृथ्वी
माती, दगड व त्यापासून निर्माण झालेले सर्व जड, कठीण, घन पदार्थ.
[संपादन] आप (जल)
पाणी, वाफ, ढग व सर्व द्रव, ओले, मृदू पदार्थ.
[संपादन] तेज (अग्नी)
ऊर्जा: अग्नी, किरणे, प्रारणे (Radiation), उष्णता, वीज, प्रकाश या स्वरूपात.
[संपादन] वायू
हवा, चैतन्य, हालचाल, चलनवलन, तरलता आणि वेग.
[संपादन] आकाश
अवकाश, आकाश व पोकळी.