नियम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नियम हे अष्टांगयोगातील दुसरी पायरी होत. जीवन जगण्यासाठी पाळावयाच्या काही गोष्टी.
यात पुढील पाच गोष्टींचा समावेश आहे.
- शौच (शरीर व मनाची शुद्धता)
- संतोष (सहजासहजी मिळेल त्यात तृप्त राहणे, अधिक हाव न धरणे)
- तपस (विरुद्ध गोष्टी सहन करणे उदा. शीत-उष्ण, सुख-दु:ख इ.)
- स्वाध्याय (योगशास्त्राचा अभ्यास)
- ईश्वर प्रणिधान (ईश्वराला शरण जाणे, सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करणे)
अष्टांगयोग |
---|
यम - नियम - आसन - प्राणायाम - प्रत्याहार - धारणा - ध्यान - समाधी |