एडवर्ड बॅलियोल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एडवर्ड बॅलियोल (इ.स. १२८३ - इ.स. १३६७) स्कॉटलंडचा राजा होता.
हा जॉन बॅलियोल व इसाबेला दि वॉरेनचा सगळ्यात मोठा मुलगा होता. त्याने ईंग्लंडचा राजा एडवर्ड तिसरा याच्या साहाय्याने स्कॉटलंडचा तत्कालीन बालराजा डेव्हिड दुसऱ्याला पदच्युत केले व राज्य मिळवले.
त्याने इ.स. १३३२चे काही महिने, इ.स. १३३३-इ.स. १३३४ व इ.स. १३३५-इ.स. १३३६ या काळात स्कॉटलंडवर राज्य केले.