See also ebooksgratis.com: no banners, no cookies, totally FREE.

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
ऋतू - विकिपीडिया

ऋतू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


ऋतू हा वर्षाचा हवामानावर आधारीत, ढोबळपणे बनवलेला, भाग आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] ऋतूंची संख्या

प्रदेशागणिक हवामानबदलामुळे ऋतूंची नेमकी संख्या बदलते. ही विभागणी मुख्यतः तापमान आणि पाऊस या घटकांवर आधारीत आहे.परंतु प्रदेशागणिक हे घटकदेखील बदलतात. उदा. उष्ण कटिबंधातील लोक फक्त तापमानाच्या आधारावर ऋतू ठरवतात कारण तेथे पाऊस वर्षभर पडत असतो.समशीतोष्ण कटिबंध दोन किंवा तीन ऋतू मानतो तर शीत कटिबंधातील प्रदेशांमध्ये केवळ दोनच ऋतू असतात. मात्र भारतामध्ये वर्षाला तीन मुख्य ऋतूंमध्ये विभागले आहे: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा.

[संपादन] ऋतूमागील कारणे

आकृती क्र. १

सूर्यामूळे ऋतूंची निर्मीती

ही आकृती सूर्य आणि पृथ्वीच्या गतीमुळे होणारी ऋतूंची निर्मीती स्पष्ट करते. याची नोंद घ्या की दिवसाची कुठलीही वेळ असली तरी (कारण पृथ्वीचे परिवलन) उत्तर ध्रुव अंधारातच असतो तर दक्षिण ध्रुव प्रकाशमान राहतो (ध्रुवीय हिवाळा हा देखील लेख पहा). पृथ्वीवर पडत असलेल्या प्रकाशाच्या घनतेबरोबरच, पृथ्वीच्या वातावरणात येणारा प्रकाश व्यर्थ जातो जेव्हा तो पृथ्वीच्या छायेत पडतो. अर्थातच ही आकृती फक्त उत्तर गोलार्धातील हिवाळ्यादरम्यानची आहे.
आकृती क्र. २

परिभ्रमणामुळे बदलणारे ऋतू

पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धातील आणि दक्षिण गोलार्धातील ऋतूचक्र चालू राहते.

विविध ऋतू असण्याचे प्राथमिक कारण म्हणजे पृथ्वीचा अक्ष पृथ्वीच्या भ्रमण प्रतलाशी काटकोनात नसणे हे होय. तो काटकोनापासून '२३.५' अंशाने कललेला आहे. त्यामुळे उन्हाळा किंवा हिवाळ्यात केंव्हाही पृथ्वीच्या एका भागावर जास्त सूर्यप्रकाश पडतो. जसजशी पृथ्वी सूर्यभ्रमण करते तसतसा सूर्यप्रकाश कमी जास्त होत राहतो. त्यामुळे तापमानात फरक होतो आणि ऋतू बदलतात. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धात दोन विरुद्ध ऋतू चालू असतात.

ऋतुंमध्ये होणारे हवामानातील फरक इतर बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असतात, जसे की -पृथ्वीची गती (परिवलन आणि परिभ्रमण),सूर्याची पृथ्वीकडे येणारी उष्णता,समुद्र किंवा मोठी सरोवरे, समुद्रातील प्रवाह (जसे एल निनो प्रवाह), आणि वार्‍यांचे प्रवाह हे हवामानावर परिणाम करतात. या सर्व घटकांमध्ये नवीन भर पडली आहे ती म्हणजे - जागतिक उबदारपणा किंवा Global Warming.

[संपादन] संस्कृती आणि ऋतू

जगात विविध संस्कृतीमधील लोक वेगवेगळे ऋतू मानतात. उदा. हिंदू पंचांगाप्रमाणे वर्षात सहा ऋतू आहेत. खालील समीकरणे प्रतिकात्मक आहेत.

 वसंत + ग्रीष्म = उन्हाळा
 वर्षा  + शरद  = पावसाळा
 हेमंत + शिशिर = हिवाळा

उत्तर ऑस्ट्रेलिया प्रदेशातील लोक सहा ऋतू मानतात तर विषुववृत्तीय, उष्ण कटिबंधीय आणि काही समशीतोष्ण कटिबंधातील प्रदेशांमध्ये सुका ऋतू आणि ओला ऋतू (पावसाचा ऋतू) असे दोनच प्रकार मानले जातात ज्यामध्ये आर्द्रतेच्या प्रमाणात होणारा बदल हा तापमानातील बदलापेक्षा जास्त लक्षणीय ठरतो. प्राचीन इजिप्तमध्ये तीन ऋतू मानले जात होते: पुराचा ऋतू, पूर ओसरण्याचा ऋतू आणि सुगीचा ऋतू. त्याचप्रमाणे काही प्रदेशांमध्ये तेथील विशिष्ट परिस्थितींनुसार ऋतू मानले जातात, जसे टोर्नाडो ऍली या संयुक्त संस्थाने देशातील भागामध्ये टोर्नाडो वादळाचा ऋतू असतो (उत्तर हिवाळ्यापासून ते मध्य उन्हाळ्यापर्यंत). भूमध्यसागरी हवामान असणार्‍या प्रदेशांमध्ये (उदा. पश्चिम ऑस्ट्रेलिया, कॅलिफॉर्निया किनारपट्टी आणि स्पेन, वगैरे) उन्हाळातील वणव्यांचा ऋतू असतो. चक्रीवादळांचा ऋतू उत्तर वसंताच्या आसपास सुरू होतो. पूर्वोत्तर प्रशांत महासागरी प्रदेशांमध्ये हा ऋतू मे १५ तर उत्तर अटलांटिक प्रदेशांमध्ये जूनच्या एक तारखेला सुरू होतो.

[संपादन] विविध प्रदेशातील ऋतू

प्रदेशागणिक होणारा हवामानातील बदल हा वाढत्या अंतरानुसार अधिक स्पष्ट होतो. जसे की एकाच गावातील दोन ठिकाणचे हवामान सारखेच मानले जाते, तेव्हा सू़क्ष्म फरक बाजूला ठेवले जातात. परंतु हीच दोन ठिकाणे काही शे किंवा हजार किलोमीटर अंतरावर असतील तर मात्र ही ठिकाणे वेगवेगळ्या हवामानाची असू शकतात. त्याचसोबत सभोवतालची भौगोलिक परिस्थितीही त्याकरिता महत्वपूर्ण ठरते. उदा. काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ मधील हवामान खूपच वेगळे आहे, तसेच ऋतूदेखील थोडे अधिक वेगळे आहेत. पण हा ऋतूंमधील फरक काश्मीर आणि कन्याकुमारी दरम्यान जास्त स्पष्ट दिसून येतो. हीच अंतरे काही हजार किलोमीटर पर्यंत वाढविल्यास विविधता देखील वाढते. वर्षभरातील तापमानानुसार पृथ्वीचे अनेक भाग कल्पिलेले आहेत. त्यानुसार शीत कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि उष्ण कटिबंध हे तीन मुख्य विभाग भाग पडतात.


महिने आणि ऋतू
उत्तर गोलार्ध महिना दक्षिण गोलार्ध
पारंपारिक हवामानशास्त्रीय खगोलिय हवामानशास्त्रीय खगोलिय
हिवाळा हिवाळा हिवाळा जानेवारी उन्हाळा उन्हाळा
वसंत फेब्रुवारी
वसंत मार्च शरद
वसंत एप्रिल शरद
उन्हाळा मे
उन्हाळा जून हिवाळा
उन्हाळा जुलै हिवाळा
शरद ऑगस्ट
शरद सप्टेंबर वसंत
शरद ऑक्टोबर वसंत
हिवाळा नोव्हेंबर
हिवाळा डिसेंबर उन्हाळा



[संपादन] शीत कटिबंध

[संपादन] ध्रुवीय प्रदेश

[संपादन] ध्रुवीय दिवस आणि रात्र

[संपादन] टुंड्रा प्रदेश

[संपादन] समशीतोष्ण कटिबंध

[संपादन] मौसमी पावसाचे प्रदेश

[संपादन] उष्ण कटिबंध

[संपादन] विषुववृत्तीय प्रदेश

[संपादन] वाळवंटातील ऋतू

[संपादन] ऋतूंची सुरुवात


ऋतू
उन्हाळा - पावसाळा - हिवाळा
वसंत - ग्रीष्म - वर्षा - शरद - हेमंत - शिशिर



aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -