आनंद यादव
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आनंद यादव(जन्म: नोव्हेंबर ३०, इ.स. १९३५ कोल्हापूर) हे प्रसिद्ध मराठी ग्रामीण लेखक आहेत. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललितलेखन अशा विविध साहित्यप्रकारात त्यांनी लेखन केले आहे. कोल्हापूर व पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. नभोवाणीवर त्यांनी काही काळ नोकरी केली. पुणे विद्यापीठातून प्रपाठक म्हणून नियुक्ती झाल्यावर तेथेच मराठी विभागाचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी १९९० मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] प्रकाशित साहित्य
आनंद यादव यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे-
[संपादन] काव्यसंग्रह
- हिरवे जग
- मळ्याची माती
[संपादन] कथासंग्रह
- खळाळ
- डवरणी
- उखडलेली झाडे
[संपादन] ललितलेख संग्रह
- मातीखालची माती (१९६५)
- स्पर्शकमळे (१९७८)
- पाणभवरे (१९८२)
[संपादन] कादंबरी
- गोतावळा
- नटरंग
[संपादन] आत्मचरित्रात्मक
- झोंबी
- नांगरणी
- घरभिंती
- काचवेल