फ्रांकफुर्ट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
फ़्रांकफुर्ट आम माइन हे जर्मनीच्या हेस राज्यातील सर्वात मोठे शहर असून बर्लिन, हांबुर्ग, म्युन्शेन, क्यॉल्न या शहरांनंतर जर्मनीतले पाचवे मोठे शहर आहे.
माइन नदीकाठावर वसलेले फ्रांकफुर्ट जर्मनीतील आर्थिक व दळणवळण-वाहतुकीचे केंद्र आहे. युरोपीय केंद्रीय बँक, फ्रांकफुर्ट स्टॉक एक्स्चेंज फ्रांकफुर्टमध्येच असल्यामुळे हे शहर युरोपाच्या मुख्यभूमीवरील महत्त्वाच्या दोन आर्थिक केंद्रांपैकी(दुसरे केंद्र पॅरिस) एक मानले जाते.