जळगाव जिल्हा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जळगाव जिल्ह्यास पूर्वी पूर्व खानदेश असे संबोधले जात असे. जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, दक्षिण-पूर्व दिशेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , दक्षिण-पश्चिमेस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते, ही शेती भारतातील इतर शेतक-यांच्या साठी एक आदर्श उदाहरण आहे. जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे.
जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० कि.मि² आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंता पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जिल्हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणी देखिल बोलली जाते. जिल्ह्यात सरासरी ६९० मि.मि इतका पाऊस पडतो. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- ताप्ती, पूर्णा, गिरणा, वाघूर
प्रसिध्द कवी बालकवी व कवियत्री बहिणाबाई चौधरी ह्या जळगाव जिल्ह्यातील आहेत तर साने गुरुजी ह्यांची ही कर्मभूमी होय.
जळगाव जिल्ह्यात समाविष्टतालुके- चाळीसगाव, भडगांव, पाचोरा, जामनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, जळगाव तालुका, भुसावळ, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, यावल, रावेर व बोदवड
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे: श्री पद्मालय,एरंडोल (अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ), परोळा किल्ला (झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचा किल्ला), पाल (यवळ तालुका)-थंड हवेचे ठिकाण, फारकंडे मनोरा, पटनादेवी (भास्कराचार्य यांचे जन्मस्थळ व देवस्थान), उनापदेव (चोपडा) गरम पाण्याचे झरे, संत मुक्ताबाई मंदिर, संत चांगदेव मंदिर, मनुदेवी मंदिर, ओंकारेश्वर मंदिर (जळगाव शहर)
[संपादन] संदर्भ
|
||
---|---|---|
राजधानी | मुंबई | |
विषय | इतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन | |
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशिम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर | |
मुख्य शहरे | औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • सोलापूर • धुळे | |
मुख्यमंत्री | वाय. चव्हाण · एम. कन्नमवार · वी. नाईक · एस. चव्हाण · वी. पाटील · एस. पवार · ए. आर. अंतुले · बी. भोसले · एस. निलंगेकर · एस. नाईक · एम. जोशी · एन. राणे · वी. देशमुख · एस. शिंदे |