गॅलापागोस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख गॅलापागोस द्वीपसमूहाबद्दल आहे. ईतर अर्थांसाठी पहा गॅलापागोस-निःसंदिग्धिकरण.
गॅलापागोस द्वीपसमूह पॅसिफिक महासागरातील विषुववृत्ताच्या आसपासची १३ मोठी द्वीपे, ६ छोटी द्वीपे व १०७ दगड व कातळांचा बनलेला आहे. याचे स्पॅनिश (स्थानिक भाषा) नाव आर्किपेलागो दि कोलोन आहे. यातले सगळ्यात जुने द्वीप अंदाजे ५० लाख ते १ कोटी वर्षांपूर्वी तयार झालेली आहेत. ज्वालामुखीमुळे तयार झालेले नवीन द्वीप ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहेत. अजुनही या ज्वालामुखींचे उद्रेक होत आहेत. शेवटचा उद्रेक इ.स. १९९८ मध्ये झाला.
या बेटांवर असलेली जैवीक विवीधता वेगळी राहीली गेली कारण याचा कोणत्याही मुख्य खंडांशी संबंध आला नाही. (संदर्भ?) त्यामुळे येथे असलेले सजीव व वनस्पती वेगळ्या रीतीने उत्क्रांत होत गेल्या असे दिसून आले. (संदर्भ?) या बेटा वरील जैवीक विवीधता पाहून चार्ल्स डार्विन ने उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडला. त्याचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत या बेटांवरील स्थानिक जीवसृष्टी पाहून सुचला. या बेटावर आता सहली आयोजित केल्या जातात. पुर्वी आलेल्या स्पॅनीश लोकांनी इथल्या अनेक महत्वाच्या जीवांच्या कत्तली केल्या जसे की येथील मोठ्या पाठीची कासवे व छोटे पेंग्वीन पक्षी. मात्र आता हे एक अभयारण्य व जागतिक किर्ती असलेले पर्यटन विषयक ठिकाण आहे.