सोनेरी वानर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सोनेरी वानर[१] | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
|
||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||
Trachypithecus geei (Khajuria, 1956) |
सोनेरी वानर ही वानरांमधील एक जात आहे ( शास्त्रीय नाव - Trachypithecus geei) ही वानरे फक्त भारत-भूतान मधील मानस राष्ट्रीय उद्यानात दिसून येतात. इतर वानरांपेक्षा ही जात अत्यंत दुर्मिळ आहे व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
नावा प्रमाणेच ह्या वानराची फर सोनेरी रंगाची असते म्हणून यास सोनेरी वानर असे म्हणतात. याची उंची साधारणपणे अर्धामीटर पर्यंत असते व वजन १०-१२ किलोपर्यंत भरते. झाडांची पाने व फळे हा यांचा मुख्य आहार आहे. इतर वानरांप्रमाणेच हेही वानर मुख्यत्वे कळप करुन रहातात. कळपाचा म्होरक्या नर असतो व इतर माद्या असतात[२].
[संपादन] संदर्भ
- ↑ साचा:MSW3 Groves
- ↑ सोनेरी वानराची माहिती