रामटेक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवल्या गेले. नागपूर पासून ५५ कि.मी. वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. येथून आजूबाजूच्या परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. श्रीरामाचे सेना गण म्हणजे वानरांचा मुक्त संचार येथे आहे. नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे.
संस्कृत काव्यातील एक अभिजात कलाकृती म्हणजे 'शाकुंतल'. कविकुलगुरू कालिदासाने हे काव्य याच रामटेक परिसरात लिहिले आहे. आज या कालिदासांच्या नावाने येथे संस्कृत विद्यापीठ सुरू आहे.
रामटेक परिसरात नुकताच पुरातन बौद्ध संस्कृतीचा शोध लागला आहे. त्या परिसरात उत्खनन चालू आहे.
नागपूर जिल्ह्यातील तालुके |
---|
नागपूर शहर | नागपूर ग्रामीण | सावनेर | कळमेश्वर | नरखेड | काटोल | पारशिवनी | रामटेक | हिंगणा | मौदा | कामठी | उमरेड | भिवापूर | कुही |