येवला
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
येवला हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याचे गाव आहे. येथे हातमागावरील पैठणी विणण्याचा व्यवसाय आहे. काही ठिकाणी यंत्रमाग वापरले जायला लागले आहेत. पैठणीवरील पारंपारिक नक्षीदार कलाकुसरी साठी येवला प्रसिद्ध आहे. या नक्षी मध्ये मोराची प्रतिकृती जास्त लोकप्रिय आहे. या पैठण्या आता निर्यातही होतात.