मधुराष्टकम्
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग | |
वेद | |
---|---|
ऋग्वेद · यजुर्वेद | |
सामवेद · अथर्ववेद | |
वेद-विभाग | |
संहिता · ब्राह्मणे | |
आरण्यके · उपनिषदे | |
उपनिषदे | |
ऐतरेय · बृहदारण्यक | |
ईश · तैत्तरिय · छांदोग्य | |
केन · मुंडक | |
मांडुक्य ·प्रश्न | |
श्वेतश्वतार ·नारायण | |
वेदांग | |
शिक्षा · चंड | |
व्याकरण · निरुक्त | |
ज्योतिष · कल्प | |
इतिहास | |
रामायण · महाभारत | |
इतर ग्रंथ | |
स्मृती · पुराणे | |
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई | |
पंचतंत्र · तंत्र | |
स्तोत्रे | |
मनाचे श्लोक · रामचरितमानस | |
शिक्षापत्री · वचनामृत |
अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम्
हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||१||
मधुराधिपतिचे ओठ मधुर आहेत, वदन (मुख) मधुर आहे, नयन मधुर आहेत, हास्य मधुर आहे, हृदय मधुर आहे, गती मधुर आहे. मधुराधिपतिचे सर्वच मधुर आहे. ॥ १ ॥
वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरम्
चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||२||
त्याचे बोलणे मधुर आहे. त्याचे चरित्र मधुर आहे. वस्त्र मधुर आहे, अंगविक्षेप मधुर आहेत, चालणे मधुर आहे, फिरणे मधुर आहे. मधुराधिपतिचे सर्वच मधुर आहे. ॥ २ ॥
वेणुर्मधुरो रेणुर्मधुरः पाणिर्मधुरः पादौ मधुरौ
नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||३||
त्याची बासरी मधुर आहे, चरणरज मधुर आहेत, हात मधुर आहेत, पाय मधुर आहेत, नृत्य मधुर आहे, सख्य मधुर आहे, मधुराधिपतिचे सर्वच मधुर आहे. ॥ ३ ॥
गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम्
रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||४||
त्याचे गान मधुर आहे, पिणे मधुर आहे, भोजन (खाणे) मधुर आहे, शयन मधुर आहे, रुप मधुर आहे, तिलक मधुर आहे, मधुराधिपतिचे सर्वच मधुर आहे. ॥ ४ ॥
करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरम्
वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||५||
त्याचे कार्य (कृति) मधुर आहे, पोहणे मधुर आहे, हरण मधुर आहे, स्मरण मधुर आहे, वमन मधुर आहे, शान्ति मधुर आहे, मधुराधिपतिचे सर्वच मधुर आहे. ॥ ५ ॥
गुञ्जा मधुरा बाला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा
सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||६||
त्याच्या गुंजा मधुर आहेत, माळा मधुर आहेत, यमुना मधुर आहे, तरंग मधुर आहेत, जल मधुर आहे, कमल मधुर आहे. मधुराधिपतिचे सर्वच मधुर आहे. ॥ ६ ॥
गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरम्
दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||७||
गोपी मधुर आहेत, लीला मधुर आहे, संयोग मधुर आहे, भोग मधुर आहेत, निरीक्षण मधुर आहे, शिष्टाचार मधुर आहे. मधुराधिपतिचे सर्वच मधुर आहे. ॥ ७ ॥
गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा
दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||८||
गोप मधुर आहेत, गायी मधुर आहेत, हातातील छ्डी मधुर आहे, सृष्टी मधुर आहे, द्वैत मधुर आहे, फळ मधुर आहे. मधुराधिपतिचे सर्वच मधुर आहे. ॥ ८ ॥
.. इति श्रीमद्वल्लभाचार्यविरचितं मधुराष्टकं सम्पूर्णं ..