बॉब वूल्मर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बॉब वूल्मर हा माजी इंग्लिश क्रिकेटपटू आणि क्रिकेटप्रशिक्षक होता. प्रशिक्षक म्हणून गाजलेल्या वूल्मरने दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान क्रिकेटसंघांचे प्रशिक्षकपद भूषविले होते.
बॉब वूल्मर याचा जन्म भारतात कानपूर शहरात मे १४, १९४८ रोजी झाला होता. १९७५ मध्ये त्याने इंग्लंडकडून कसोटीत पदार्पण केले.
मार्च १८, इ.स. २००७ रोजी २००७ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान जमेका येथे वूल्मरचे निधन झाले.