फूल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
फूल फुलझाडांमधील प्रजजनाचा अवयव आहे. फुलामध्ये पुंकेसर व स्त्रीकेसर असतात व कीटकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक, रंगीबेरंगी पाकळ्या असतात. काही फुलांमध्ये मध देखील असतो.
फूल झाडाच्या स्त्री व पुरुष बीजाचे मीलन घडवून आणण्यास मदत करते व त्यानंतर फळाची निर्मिती होते. अनेक फुलांच्या समूहाला फुलोरा असे म्हणतात.
फुलाचे उपयोग सुशोभिकरणासाठी, पूजेसाठी व कीटकांना अन्न म्हणून होतो.