पचनसंस्था
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
शरिरातील अनेक अवयवांची बनलेली संस्था. या संस्थेमुळे खाल्लेल्या अन्नाचे पोषकद्रव्यांमध्ये रुपांतर होते. ही पोषकद्रव्ये शरिराची वाढ व चलनवलन यासाठी उपयोगी पडतात.
पचनसंस्थेत पुढील अवयव असतात: तोंड, अन्ननलिका, जठर, अग्न्याशय (Pancreas), यकृत, पित्ताशय (Gallbladder), लहान आतडे, मोठे आतडे, गुदाशय व गुदद्वार.