See also ebooksgratis.com: no banners, no cookies, totally FREE.

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
डाय हार्ड भाग-१, चित्रपट - विकिपीडिया

डाय हार्ड भाग-१, चित्रपट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डाय हार्ड
निर्मिती वर्ष इ.स. १९८८
दिग्दर्शन जॉन मॅकटियर्न
कथा कादंबरी: रॉडरिक थोर्प
पटकथा जेब स्टुअर्ट
स्टीवन ई. डिसूझा
संकलन जॉन एफ. लिंक
फ्रॅंक जे. युरिओस्ट्
संगीत मायकल कामेन
क्रिस बोर्डमॅन
प्रमुख कलाकार
  • ब्रुस विलिस
  • ऍलन रिकमन
  • बोनी बेडेलिया
  • रेजिनाल्ड वेलजॉन्सन
  • आलेक्सझांडर गोड्युनोव्ह
आय.एम.डी.बी वरील पान


डाय हार्ड हा अमेरीकन ऍक्शनपट असुन १९८८ मध्ये प्रदर्शित झाला होता. याचे मुख्य भूमिका ब्रुस विलिस व ऍलन रिकमन यांची आहे. हा चित्रपट रॉडरिक थोर्प यांच्या नथिंग लास्ट फोरएव्हर या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपट ऍक्शन चित्रपटांसाठी एक मैलाचा दगड असल्याचे मानले जाते. या चित्रपटातची शैली म्हणजे घडणार्‍या घटनांचा संदर्भ देणारे दुवे सातत्याने आगोदरील घटनांमध्ये दाखवणे हि शैली पुढिल अनेक सुपरहिट ऍक्शन चित्रपटात वापरली गेली. हिंदी मध्ये बाझी चित्रपटाचा काही भाग या चित्रपटावरुन कॉपी केला आहे.

[संपादन] कथानक

खालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.


चित्रपट सुरु होतो ते विमान लॉस एंजेलिसच्या धावपट्टिवर उतरत असते. त्यात न्यूयॉर्क पोलिस खात्यातिल अधिकारी जॉन मक्लेनला (ब्रुस विलिस) विमान उतरताना त्रास होतो असतो. जॉन आपली पत्नी व मुलांना भेटायला नाताळाच्या सुट्टिसाठी लॉस एंजेल्सला चाललेला असतो. विमानात जॉनला त्याच्या शेजार्‍या कडुन घरी गेल्यावर अनवाणी चालयचा सल्ला देतो जेणेकरुन त्याचा हा विमान उतरताना होणारा त्रास कमी होइल. विमानतळावर जॉनला त्याची पत्नी भेटायला येत नाही व त्याऍवजी तिच्या कंपनीने पाठवलेला ड्रायव्हर येतो. ड्रायव्हर हा नुकताच परवाना (लायसंस) मिळवलेला पोरगा असतो व जॉन हा त्याच्या ड्रायव्हिंग कारकिर्दीतील पहिला ग्राहक असतो. जॉनची पत्नी हॉली जेनेरो देखील जॉनची वाट पाहात असते व गेल्या काही महिन्यातिल घडामोडिंमुळे व्यथित असते. ती लॉस एंजेल्समधिल एका नाकाटोमी कॉरपोरेशन या जापानी कंपनीत वरच्या हुद्यावर काम करत असते. हॉलिने कंपनी मध्ये बढति मिळवण्यासाठी आपल्या लग्नाआधिच्या नावाचा वापर केलेला असतो. जेणेकरुन तिला बढती मिळणे सोपे असते. तसेच नोकरीसाठी तिने जॉनचे न्युयोर्क मधिल घर सोडुन लॉस एंजेल्स मध्ये आलेली असते. या गोष्टी जॉनला खटकत असतात व तिला जाब विचारण्यासाठि तिला भेटायला म्हणून घराच्या ऍवजी तिच्या ऑफिस मध्ये भेटणे पसंत करतो. हॉलिचे ऑफिस हे नाकाटोमी कॉर्पोरेशनच्या ४० मजली इमारतीत असते. जेव्हा जॉन तिच्या ऑफिस मध्ये पोहोचतो तेव्हा तिथे कंपनीची नाताळाची पार्टी ३० व्या मजल्यावर चालू असते. जॉनचे माफक स्वागत होते व तो हॉलिला भेटतो.

चित्रपटातील नाकाटोमी प्लाझाची इमारत
चित्रपटातील नाकाटोमी प्लाझाची इमारत

याच दरम्यान इमारतीच्या तळमजल्या मध्ये काही लोक सामान पोस्त करणार्‍या गाडितुन आत घुसतात व त्याच वेळेस दोन जण पहिल्या मजल्यवरील रिसेप्शन मध्ये पोहोचतात. पोहोचताच तेथिल रिसेप्शनिस्ट ला गोळी घालुन ठार करतात व रिसेप्शन चा ताबा घेतात. लगेचच पहिल्या मजल्यावरील सुरक्षारक्षकाला ठार करतात. सर्व ठिक असे पाहुन ते डिलिव्हरी वॅन मधिल लोकांना वर जाण्याचा इशारा करतात व लगेचच इमारतिचे सर्व दरवाजे बंद करुन टाकतात. या लोकांचा सुत्रधार असतो हान्स ग्रुबर (ऍलन रिकमन) हा जर्मन रॅडिकल ग्रुप चा सदस्य असतो व आपले काहि जर्मन साथिदारांना घेउन हि इमारत व नाकाटोमीचे कर्मचारी यांचे अपहरण करण्याचा त्याचा डाव असतो. हान्स व त्याचे साथिदार पार्टी चालु असते त्याठिकाणी पोहोचतात व त्याच वेळेस इतर साथिदार इमारतिची संपर्क व्यवस्था बंद पाडणे, बंदुका व क्षेपणास्त्रे यांची रवानगी व इमारतिमध्ये ठिकठिकाणी बॉम्ब पेरणे इत्यादि कामे करत असतात. हॅन्स व त्याचे साथिदार पार्टीमध्ये घुसण्या आगोदर जॉन व हॉली मध्ये छोटेसे भांडण होते. हॉलिला पार्टिमध्ये बोलवणे आल्यामुळे ती जॉनला विश्रामकक्षामध्ये सोडुन पार्टिमध्येजाते. जॉन विश्रामकक्षामध्ये अनवाणी चालण्याचा सराव करतो व आपल्या ड्रायव्हरशी फोन वर बोलतो. त्याचे बोलण्या मध्येच फोन बंद पडतो. हॅन्स व त्याचे साथिदार अचानक पार्टीमध्ये घुसतात व गोळीबार करुन सर्वामध्ये दहशत निर्माण करतात. गोळीबारामुळे जॉन सावध होतो व त्याच्या कक्षा पर्यंत हान्स चे साथिदार येइ पर्यंत पळुन जातो. हान्स सर्व जण जमल्याची खात्री झाल्यावर कंपनीचे डायरेक्टर मि टकागी कुठे आहेत असा प्रश्न विचारतो. टकागीचे त्याला माहिती असलेले वर्णन सांगयाला सुरुवात करतो त्यामुळे टकागींना लपुन राहाण्यात काही अर्थ वाटत नाही. व हान्स ला काय काम आहे असे विचारतात. हान्स टकागींना दुसर्‍या मजल्यावर घेउन जातो.

दुसर्‍या मजल्यावर टकागींना हान्स त्यांच्या कंपनीच्या तिजोरीचा पासवर्ड विचारतो. व हान्स हा चोरी करायच्या उद्देशाने आला आहे असे समजते. टकागी पासवर्ड देत नाहित व हान्सला सांगतात कीया परिस्थितित तुम्हाला मला मारावेच लागेल. टकागीला मारताना जॉन पाहातो व हान्सला शंका येते की कोणीतरी पकडायचे राहिले आहे. तो आपल्या साथिदारांना जॉनला शोधायचे आदेश देतो. हान्स ने बरोबर पासवर्ड शोधुन काढणार हॅकर बरोबर आणलेला असतो व त्याला तो पासवर्ड शोधायच्या कामावर लावतो.

जॉनला या परिस्थितीत पोलिसांना खबर कशी पोहोचेल याचा विचार करत असतो तो बिल्डिंगचा अग्नीशमन अलार्म वाजवतो पण तो प्रयत्न हान्स उधळुन लावतो. जॉन कुठे आहे त्याचा पत्ता लागल्याने एक जण त्याला शोधत शोधत ३४ व्या मजल्यावर पोहोचतो. जॉन व त्याची हातापाई होते व त्यात जॉन त्याला जिन्यामध्ये पाडुन ठार करतो. या साथिदाराकडिल बॅगेत जॉनला मशीन गन व वॉकिटॉकिचा संच मिळतो. जॉन त्याचा मृतदेह लिफ्ट मधुन ३०व्या मजल्यावर पाठवुन देतो व हान्सला त्याच्या विरुद्ध रणशिंग पुकारल्याची सुचना देतो.

जॉन वॉकिटॉकि घेउन इमारतिच्या गच्ची वर जातो व पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो व परिस्थिति सांगतो. त्याची मागणी पोलिस कक्षामध्ये कोणीतरी जोक करत आहे असे समजतात या दर्म्यान जॉन इमारतिच्या गच्चीवर आहे असे हान्स ला कळते तो त्याचा भरवशाचा साथिदार कार्लला जॉन चा वध करयाला पाठवतो. पोलिस नियंत्रण कक्षेमध्ये बोलत असतानाच कार्ल त्याच्यावर गोळिबार सुरु करतो. गोळिबाराचा आवाज आल्यामुळे पोलिस नियंत्रण कक्षेमधुन चौकशी करण्यासाठी त्या भागातिल गस्ति वर असलेला पोलिस पॉलला पाठवण्यात येते. इकडे जॉन व कार्ल मध्ये जोरदार घुमश्च्क्री होते. इमारति मध्ये पोलिस आल्यामुळे कार्लला तात्पुरती माघार घ्यावी लागते.

पोलिस अधिकारी पॉल इमारतिमध्ये आल्यावर हान्स चे रिसेप्शन मधिल साथिदार सर्व काहि ठिक आहे असे भासवतात. जॉन पॉलशी खिडकीतुन ओरडुन सांगण्याचा प्रयत्न करतो व परत एकदा हान्स चे साथिदार त्याच्या वर तुटुन पडतात. जॉन हान्सचे दोन साथिदारांना यमसदनी धाडतो. त्यापैकी एकाचा मृतदेह घेउन तो सरळ खाली उभ्या असलेल्या पॉलच्या गाडिवर टाकुन देतो व गोळिबार करतो. या प्रकाराने पॉल एकदम गडबडुन जातो व इथे खुप अतिरेकि असुन मला जादाची कुमक पाहिजे अशी मागणी करतो. यानंतर इमारतिला पोलिसांचा वेढा पडतो. पण याचा परिणाम म्हणून हान्सची पुढची कामे अजुन पटापट होतात. दरम्यान पोलिस इमारतिमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. हान्स पोलिसांविरुद्ध आक्रमण करतो, पोलिसांचे जीव जाताना पाहुन जॉन त्याला सापडलेल्या डिटोनेटर्सचा स्फोट घडवुन आणतो. यामुळे बिल्डिंग चे मोठे नुकसान होते तो पोलिसांची सहानुभूती गमावुन बसतो. दरम्यान हॉलिचा सहकारी शहाणपणा दाखवायला जाउन जॉन कोण आहे हे हान्सला सांगतो, पण जॉन तो आपला मित्र नसल्याचे हान्सला वॉकिटॉकि वर सांगतो. हान्स हॉलिच्या सहकार्‍याला मारुन टाकतो.

बाहेर एफ्.बी.आय. परिस्थिती ताब्यात घेते हान्स आपली मागणी त्यांच्यापुढे सादर करतो. त्यामध्यत प्रामुख्याने काहि दहशतवादी संघटनेच्या लोकांची सुटकेची व इमारतीपासुन विमानतळापर्यंत जाण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी असते. एफ्.बी.आय त्याची मागणी मान्य झाल्याचे नाटक करते. हान्स व कार्लची पुन्हा एकदा जॉनशी जोरदार धुमश्चक्री होते यात हान्सचे अजुन काही साथिदार मारले जातात व जॉन अनवाणी असल्याने खुप जखमी होतो व बचावुन निघतो. एफ.बी.आय संपुर्ण इमारतिची वीज तोडुन टाकते त्यामुळे हान्सच्या हॅकरला जी तिजोरी तोडणे शक्य होत नाही ती आरामात उघडली जाते. हान्स व त्याचे उरलेले साथिदार इमारतिचा वरचा भाग बॉम्बने उडवुन पैसे घेउन पोबारा करण्याचा प्रयत्नात असतात पण पुन्हा जॉन त्यांचे प्रयत्न उधळुन लावतो व एक एक करुन सर्व साथीदार संपवतो. हान्सला हॉलि जॉनची पत्नी आहे असे कळते व तिला बंधक बनवुन शेवटचा पळुन जायचा प्रयत्न करतो. जॉन हान्सला शेवटी गोळी घालतो व हॉलिला त्याच्या ताब्यातुन सोडवतो. हान्सचा इमारतिवरुन खाली पडुन म्रुत्यू होतो. शेवटि जॉन आपल्या पत्नीची ओळख पॉलला हॉलि जेनेरो अशी करुन देत असतान हॉलि मध्येच त्याला तोडुन मी हॉलि मक्लेन आ हे अभिमानाने सांगते व जॉन व हॉलिमधिल तणाव पुन्हा एकदा सुरळित होतो.

[संपादन] भूमिका

कलाकार भूमिका
ब्रुस विलिस जॉन मक्लेन
ऍलन रिकमन हान्स ग्रुबर
बोनी बेडेलिया होलि जेनेरो-मक्लेन
रेगीनाल्ड वेलजॉन्सन पोलिस अधिकारी पॉल
आलेक्सझांडर गोड्युनोव्ह कार्ल


aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -