गुयुक खान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
गुयुक खान | ||
---|---|---|
खान (मंगोल शासक) | ||
अधिकारकाळ | १२४६ - १२४८ | |
पूर्वाधिकारी | ओगदेई खान | |
वडील | ओगदेई खान | |
आई | तोरेगीन खातून | |
राजघराणे | बोर्जिगीन |
गुयुक खान हा मोंगोल सरदार ओगदेई खानचा मुलगा होता. हा अत्यंत बेजबाबदार व उर्मट होता. ओगदेईला आपल्या पश्चात तो गादीवर बसावा असे वाटत नव्हते. ओगदेईच्या मृत्यूनंतर त्याची बायको व गुयुकची आई तोरेगीन खातूनने सुमारे ४-५ वर्षे राज्यकाळ सांभाळला व नंतर गुयुकला बसवले.
बेजबाबदार व जुलमी गुयुक खानाने गादीवर बसल्यावर सर्व जुन्या सल्लागारांना देहांताची शिक्षा दिली. जोचीचा मुलगा बाटु खान याला गुयुक खानाची नियुक्ती मान्य नव्हती. या दोघांतील बेबनाव वाढत होता व या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी रशियाच्या दिशेने निघालेल्या गुयुकचा अकस्मात मृत्यू झाला.
गुयुक खानानंतर सत्ता तोलुई खानच्या घराण्याकडे गेली.